शहरं
Join us  
Trending Stories
1
Philippines Protest 2025: फिलिपिन्समध्ये लोक रस्त्यावर; भ्रष्टाचाराविरोधात देशभरात आंदोलन पेटले
2
Local Body Elections: नगरांच्या निवडणुकांमध्ये 'दुसरा' टप्पा, काही ठिकाणी २० डिसेंबरला मतदान
3
अग्रलेख : शेवटी मरण कार्यकर्त्यांचेच! अधिकाऱ्यांवर काय कारवाई होणार?
4
फोनमध्ये सिम नसल्यास अॅप्स वापरता येणार नाहीत; दर सहा तासांनी व्हॉट्सअॅप वेब थेट लॉगआउट होणार!
5
नगर परिषद, नगर पंचायत निवडणूक २०२५:  रात्री दहापर्यंत पडणार आश्वासनांचा 'पाऊस'!
6
विशेष लेख: इम्रान खान जिवंत आहेत की नाहीत?
7
Vande Bharat Depot: पुण्यासह राज्यात तीन ठिकाणी वंदे भारत 'कोचिंग डेपो' वाढविणार
8
मध्य रेल्वेवर लवकरच २० प्लॅटफॉर्म वाढणार, कोकणसाठी अतिरिक्त मेल, एक्स्प्रेस चालवणे शक्य
9
IND vs SA 1st ODI : टॉस गमावला, पण मॅच जिंकली! कसोटीतील बिघाडीनंतर टीम इंडियाची वनडे मालिकेत आघाडी
10
हाताला सलाइन, नाकाला ऑक्सिजन पाइप; छगन भुजबळांचा रुग्णालयातून प्रचार, भावनिक होत म्हणाले...
11
“कितीही करा कल्ला, मालवण शिवसेनेचाच बालेकिल्ला”: एकनाथ शिंदे; निलेश राणेंचेही केले कौतुक
12
“मुंबईत ठाकरेंचे काही चालणार नाही, उद्धव यांनी राज यांना सोबत घेऊन चूक केली”; कुणाचा दावा?
13
“नवरा १००₹ देत नव्हता, पण देवाभाऊ लाडक्या बहिणींना १५०० देतात”; भाजपा नेत्यांचे विधान चर्चेत
14
SIR तपासात गडबड उघड! गोव्यात ९० हजार मतदारांवरील मोठी विसंगती आली समोर; अधिकारी म्हणाले...
15
०१ डिसेंबरला रेल्वे नियम बदलणार! तत्काळ तिकिटासाठी लागणार OTP; मुंबईतील ‘या’ ट्रेनपासून सुरू
16
“जिकडे बॉम्बे असेल तिकडे मुंबई करू, शाळेची नावेही बदलू”; उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला निर्धार
17
IND vs SA 1st ODI : कुलदीपनं ३ चेंडूत फिरवली मॅच! एकाच ओव्हरमध्ये २ विकेट्स अन्...
18
VIDEO : "समझने वालों को इशारा काफी!" विराटला गंभीरची मिठी; पण रोहितची रिअ‍ॅक्शनच ठरली 'शोस्टॉपर'
19
दिल्लीतील पराभवानंतर अवध ओझा सरांचा राजकारणाला रामराम; AAP मधून बाहेर पडले...
20
VIDEO : "उपकार विसरू नका! नाहीतर…" बेताल वक्तव्य करणाऱ्या SA कोचला गावसकरांनी दिली ताकीद
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईविरुद्ध राजस्थानचा हल्लाबोल

By admin | Updated: April 14, 2015 00:54 IST

सलग दोन सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागलेल्या मुंबई इंडियन्सला मंगळवारी राजस्थान रॉयल्सच्या तगड्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.

तगडे आव्हान : विजयाची हॅट्ट्रिक नोंदविण्यास रॉयल्स प्रयत्नशीलअहमदाबाद : सलग दोन सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागलेल्या मुंबई इंडियन्सला मंगळवारी राजस्थान रॉयल्सच्या तगड्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. अहमदाबाद येथील घरच्या सरदार पटेल स्टेडियमवर खेळणारा राजस्थान रॉयल्स मुंबईविरुद्ध बाजी मारून विजयाची हॅट्ट्रिक नोंदवण्यासाठी प्रयत्नशील असेल, तर दुसऱ्या बाजूला कागदावर बलाढय वाटणारे मुंबईकर मोसमातील पहिला विजय मिळवण्यास पूर्ण ताकदीनिशी उतरतील. आयपीएलच्या पहिल्या सत्रापासूनच राजस्थानचे एक वैशिष्ट्य राहिले आहे. ते म्हणजे, या संघात फारसे लौकिक नसलेल्या खेळाडूंचा असलेला समावेश. मात्र हेच खेळाडू प्रत्यक्ष मैदानात प्रतिस्पर्ध्यांची ‘दांडी’ गुल करण्यात माहीर आहेत. त्यामुळेच कोणताही संघ राजस्थानला कधीच कमी लेखण्याची चूक करीत नाही. अजिंक्य रहाणे, स्टीव्हन स्मिथ, शेन वॉटसन यांसारख्या मुख्य खेळाडूंसोबतच हुडावरदेखील साऱ्यांचे लक्ष असेल. फलंदाजीमध्ये हा संघ रहाणे, स्मिथ, कर्णधार वॉटसन, हुडा यांच्यावर अवलंबून असून गोलंदाजीमध्ये त्यांच्याकडे मॉरिस, फॉल्कनर, टीम साऊदी, प्रवीण तांबे आणि वॉटसन असा ताफा आहे.त्याचवेळी मुंबईची स्थिती मात्र बेताचीच आहे. कागदावर हा संघ जबरदस्त मजबूत दिसत असला तरी संथ सुरुवात आणि दडपणामुळे मुंबईचा खेळ खालावतो. याचाच फायदा प्रतिस्पर्धी संघांना होतोय. (वृत्तसंस्था)च्मुंबईकडे सचिन तेंडुलकर, अनिल कुंबळे आणि रिकी पाँटिंग याचा तगडा व अनुभवी सपोर्टिंग स्टाफ असूनही संघाला लौकिकास साजेशी कामगिरी करण्यात अपयश येत आहे. च्अ‍ॅरॉन फिंच, अंबाती रायुडू पूर्णपणे फ्लॉप ठरलेत, तर पहिल्या सामन्यातील अर्धशतकानंतर धडाकेबाज कोरी अँडरसनदेखील मुंबईत अपयशी ठरला. पोलार्ड आणि कर्णधार रोहित शर्मा यांनादेखील खेळ उंचावण्याची गरज आहे.च्या फलंदाजांपैकी दोघांची जरी बॅट तळपली, तर मात्र समोर कोणताही संघ असो, त्यांच्या चिंधड्या उडणार हे नक्की. त्यामुळेच मुंबईला गरज आहे ती फक्त फलंदाज फॉर्ममध्ये येण्याची. गोलंदाजीमध्ये हरभजन, सुचित यांची फिरकी, तर विनयकुमार, मलिंगा, पोलार्ड यांचा वेगवान मारा मुंबईला तारू शकेल.रोहित शर्मा (कर्णधार), अ‍ॅरॉन फिंच, अंबाती रायुडू, अभिमन्यू मिथुन, आदित्य तरे, पार्थिव पटेल, किरॉन पोलार्ड, कोरी अँडरसन, लसिथ मलिंगा, हरभजन सिंग, जसप्रीत बुमराह, मर्चेट डी लांगे, पवन सुयाल, श्रेयस गोपाल, लेंडल सिमन्स, प्रग्यान ओझा, मचेल मैकक्लीगन, एडेन ब्लीजार्ड, अक्षय वाखरे, नितीश राणा, सिद्धेश लाड, हार्दिक पांड्या, जगदीश सुचित, उन्मुक्त चंद आणि विनयकुमार.शेन वॉटसन (कर्णधार), अभिषेक नायर, अजिंक्य रहाणे, बेन कटिंग, दीपक हुडा, धवल कुलकर्णी, दिशांत याग्निक, जेम्स फॉल्कनर, केन रिचर्डसन, करुण नायर, प्रवीण तांबे, राहुल तेवटिया, रजत भाटिया, संजू सॅमसन, स्टीव्हन स्मिथ, स्टुअर्ट बिन्नी, टीम साऊदी, विक्रमजित मलिक, ख्रिस मॉरिस, जुआन थेरोन, बरिंदर सिंग सरन, दिनेश साळुंखे, सागर त्रिवेदी आणि प्रदीप साहू.