तापामुळे रैना पहिल्या वनडेला मुकणार
By Admin | Updated: October 13, 2016 15:09 IST2016-10-13T14:59:05+5:302016-10-13T15:09:42+5:30
धर्मशाळा येथे भारत विरुद्ध न्यूझीलंडमध्ये होणा-या एकदिवसीय मालिकेआधीच टीम इंडियाला झटका बसला आहे. टीम इंडियातील ऑलराऊंडर सुरेश रैना तापामुळे आजारी पडला

तापामुळे रैना पहिल्या वनडेला मुकणार
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली,13 - भारत विरुद्ध न्यूझीलंडमध्ये होणा-या वन-डे सीरिजआधीच टीम इंडियाला झटका बसला आहे. टीम इंडियातील ऑलराऊंडर म्हणून ओळखला जाणारा सुरेश रैना तापामुळे आजारी पडला आहे, त्यामुळे धर्मशाळा येथे न्यूझीलंडविरुद्ध होणा-या वन-डे मॅचमध्ये रैना खेळू शकणार नाही,अशी माहिती बीसीसीआयने ट्विट करुन दिली आहे. न्यूझीलंड विरुद्धची ही वन-डे सीरिज 16 ऑक्टोबरपासून सुरू होत असून पहिला सामना धर्मशाळा येथे खेळला जाणार आहे. मात्र तोपर्यंत सुरैश रैनाच्या प्रकृतीत सुधारणा होणे कठीण असल्याचे दिसत आहे.
सुरेश रैना 2015 मध्ये साऊथ आफ्रिके विरुद्धच्या शेवटच्या वन-डे मॅचचे खेळताना दिसला होता. यानंतर खराब खेळीमुळे टीम बाहेर ठेवण्यात आलेल्या सुरेश रैनाची मोठ्या कालावधीनंतर टीममध्ये वापसी करण्यात आली होती. दरम्यान, रैनाच्या जागी टीममध्ये आता कोणाला जागा देण्यात येणार आहे, हे अजूनही बीसीसीआयने स्पष्ट केलेले नाही. मात्र रैनाऐवजी मनदीप सिंगला वन-डे मॅचमध्ये पर्दापण करण्याची संधी मिळू शकते,अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
NEWS ALERT - Suresh Raina to miss Dharamsala ODI due to viral fever - @Paytm ODI Trophy #INDvNZpic.twitter.com/WT4YjKm8Mf
— BCCI (@BCCI) October 13, 2016