शहरं
Join us  
Trending Stories
1
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
2
Top Marathi News LIVE Updates: मस्साजोगच्या पोटनिवडणुकीत धक्कादायक निकाल; अश्विनी देशमुख पराभूत
3
Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज
4
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
5
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
6
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
7
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
8
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
9
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
10
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
11
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
12
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
13
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
14
उन्हामुळे शरीराचे ‘हे’ तीन अवयव होऊ शकतात निकामी; डॉक्टरांनी दिले ६ खास सल्ले, जाणून घ्या
15
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
16
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
17
पाणी येताच दारी, ‘लक्ष्मी’ आली घरी! दुर्गम सातपुड्यातील नागझरीमधील हाऱ्यापाड्यावरची अनोखी ‘जलकहाणी’
18
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
19
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
20
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पावसामुळे आमची एकाग्रता वाढली : रोहित

By admin | Updated: May 7, 2015 03:40 IST

दिल्ली डेअरडेव्हील्स विरुध्दच्या महत्त्वाच्या सामन्यात धावांचा पाठलाग करताना झालेल्या पावसामुळे संघाला पुन्हा एकदा एकाग्रता मिळवण्यासाठी मदत झाली.

मुंबई : दिल्ली डेअरडेव्हील्स विरुध्दच्या महत्त्वाच्या सामन्यात धावांचा पाठलाग करताना झालेल्या पावसामुळे संघाला पुन्हा एकदा एकाग्रता मिळवण्यासाठी मदत झाली. कारण, सुरुवातीला डकवर्थ लुईस नियम लक्षात घेऊन फलंदाजी केल्यानंतर आम्ही आमच्या योजनेत बदल केला, असे मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा याने सांगितले.रोहितने या शानदार विजयाबद्दल सांगितले की, डकवर्थ लुईस नियम लक्षात घेता सुरुवातीच्या पहिल्या पाच षटकांत आम्हाला निर्धारीत लक्ष्याच्या पुढे राहणे आवश्यक होते. आम्ही सामन्यात पुढे राहण्याच्या प्रयत्नात होतो. मी मुंबईकर असल्याने पाऊस जास्तवेळ पडणार नसल्याची जाणीव होती. मात्र, हा देखील एकप्रकारचा जुगार होता, असे सांगतानाच पुन्हा खेळण्यास सुरुवात केल्यानंतर आम्ही नेहमीचा खेळ खेळण्यास सुरुवात केली आणि नशिबाने पावसाने यावेळी अडचण आणली नाही, असेही रोहित म्हणाला.या विजयासह गुणतालिकेत चौथ्या स्थानी झेप घेतल्याने आनंदित असलेल्या रोहितने या सामन्यात प्रभावी गोलंदाजी करणाऱ्या हरभजनचे कौतुक करताना सांगितले की, भज्जीची कामगिरी अद्भूत होती. सामनावीर ठरलेल्या भज्जीने चार षटकांत केवळ ११ धावा देऊन २ बळी घेतले होते. भज्जीला चांगला टर्न मिळत होता. त्याची गोलंदाजी निर्णायक ठरली. या कामगिरीत सातत्य राखण्याचा आमचा प्रयत्न असेल, असे रोहित म्हणाला.(वृत्तसंस्था)