राहुलने वादग्रस्त छायाचित्र टिष्ट्वटरवरून काढले

By Admin | Updated: July 19, 2016 06:26 IST2016-07-19T06:26:39+5:302016-07-19T06:26:39+5:30

भारतीय सलामीवीर लोकेश राहुलने वेस्ट इंडिज दौऱ्यावर बीअरसह छायाचित्र सोशल मीडियावर पोस्ट केले होते

Rahul took out the controversial picture from the detective | राहुलने वादग्रस्त छायाचित्र टिष्ट्वटरवरून काढले

राहुलने वादग्रस्त छायाचित्र टिष्ट्वटरवरून काढले


नवी दिल्ली : भारतीय सलामीवीर लोकेश राहुलने वेस्ट इंडिज दौऱ्यावर बीअरसह छायाचित्र सोशल मीडियावर पोस्ट केले होते, पण बीसीसीआयने फटकारल्यानंतर हे वादग्रस्त छायाचित्र त्याने टिष्ट्वटरवरून काढून टाकले.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने यावर नाराजी व्यक्त करताना म्हटले, की क्रिकेटपटूंनी अशा प्रकारचे छायाचित्र सोशल मीडियावर शेअर केले, तर युवा व विशेषत: बालकांवर विपरित परिणाम होतो.
कसोटी कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया चार कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी विंडीज दौऱ्यावर आहे. भारतीय क्रिकेटपटू कसोटी मालिकेपूर्वी विंडीजमधील समुद्रकिनाऱ्यावर पर्यटनाचा आनंदही घेत आहे.
सोशल मीडियावर जवळजवळ सर्वच क्रिकेटपटू संघासोबत जुळलेले छायाचित्र शेअर करतात, पण काही दिवसांपूर्वी राहुलने बीचवर आपल्या संघसहकाऱ्यांसह एक छायाचित्र पोस्ट केले होते. त्यात त्याच्या हातात बीअर असल्याचे दिसत होते. एका वृत्तपत्रातील वृत्तानुसार राहुलच्या या छायाचित्रावर बोर्डाने भारतीय संघाच्या व्यवस्थापकांच्या माध्यमातून नाराजी व्यक्त केली.
भारत आणि वेस्ट इंडिज संघांदरम्यान पहिला कसोटी सामना २१ जुलैपासून अ‍ॅन्टिग्वामध्ये खेळल्या जाणार आहे. यापूर्वी भारतीय संघाने विंडीज बोर्ड अध्यक्ष इलेव्हनसोबत दोन सराव सामने खेळले. त्यात राहुलने फलंदाजीमध्ये छाप सोडली. राहुल कसोटी कर्णधार विराट कोहलीच्या पसंतीचा खेळाडू असल्याचे म्हटले जाते. (वृत्तसंस्था)

Web Title: Rahul took out the controversial picture from the detective