राफेल नदालची यू एस ओपनमधून माघार

By Admin | Updated: August 20, 2014 00:33 IST2014-08-20T00:33:54+5:302014-08-20T00:33:54+5:30

जागतिक क्रमवारीत दुस:या स्थानावर असलेल्या स्पेनच्या राफेल नदालने मनगटाला झालेल्या दुखापतीमुळे यू एस ओपनमधून माघार घेतली आहे.

Rafael Nadal retires from the US Open | राफेल नदालची यू एस ओपनमधून माघार

राफेल नदालची यू एस ओपनमधून माघार

न्यूयॉर्क - जागतिक क्रमवारीत दुस:या स्थानावर असलेल्या स्पेनच्या राफेल नदालने मनगटाला झालेल्या दुखापतीमुळे यू एस ओपनमधून माघार घेतली आहे. 
त्याने फेसबुकच्या माध्यमातून ही माहिती दिली. नदालला गत महिन्यात सरावादरम्यान दुखापत झाली होती आणि तो त्यातून अद्याप पूर्णपणो बरा झालेला नाही. या दुखापतीमुळेच त्याने रॉजर्स कप आणि सिनसिनाटी ओपनमधून माघार घेतली होती. तो म्हणाला, यू एस ओपनमधून मी माघार घेत असल्याचे सांगताना मला दु:ख होत आहे. आशा करतो की तुम्ही मला समजून घ्याल.

 

Web Title: Rafael Nadal retires from the US Open

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.