शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

आर प्रज्ञाननंदाने जिंकले गोल्ड मेडल! पहिल्या जागतिक रॅपिड टीम चॅम्पियनशीपमध्ये टॉपर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2023 11:59 IST

आर प्रज्ञाननंदा FIDE World Rapid Team Championship  स्पर्धेत सहभागी झाला अन् त्याने त्यात गोल्ड मेडल जिंकले.

काही दिवसांपूर्वी मॅग्नस कार्लसन याच्याकडून जागतिक बुद्धीबळ स्पर्धेच्या फायनलमध्ये झालेल्या पराभवानंतर लगेचच आर प्रज्ञाननंदा FIDE World Rapid Team Championship  स्पर्धेत सहभागी झाला अन् त्याने त्यात गोल्ड मेडल जिंकले. WR Chess संघात प्रज्ञाननंदासह सो वेस्ली, अब्दुसातोरोव्ह नोडीर्बेक, नेपोमनिआचची इयान, डुडा जान-क्रझीतोफ, केयमेर व्हिन्सेंट, हो यिफान, कोस्तेनिक अलेक्झांड्रा या ग्रँडमास्टर्ससह रोसेन्स्टेन वादीम यांचा समावेश होता. या संघाने १२ पैकी १० सामने जिंकले अन् दोनमध्ये ड्रॉवर त्यांना समाधान मानावे लागले. या संघाने सर्वाधिक २२ गुणांची कमाई केली. टीम फ्रिडमला दुसऱ्या, तर भारतीय खेळाडूंचा समावेश असलेल्या टीम MGD1 ला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. यांनी अनुक्रमे २० व १८ गुणांची कमाई केली. 

बुद्धिबळाच्या ६४ घरांत भारताचे उज्ज्वल भविष्य! अर्जुन पुरस्कार विजेते प्रविण ठिपसे यांचा खास लेख

WR Chess संघाने ११व्या फेरीत विजय मिळवून जेतेपद पक्के केले, त्याच फेरीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या फ्रिडमला ड्रॉ वर समाधान मानावे लागले. विजेत्या संघाला चषक, पदक आणि १ लाख युरो ( जवळपास ९० लाख रुपये) असे पारितोषिक देण्यात आले. टीम फ्रिडमला ५४ लाख, तर MGD1 ला ३६ लाख बक्षीस रक्कम मिळाली.  MGD1संघात भारताच्या हरिकृष्णा, निहाल, एरिगैसी, साधवानी, आदित्य, श्रीनाथ, हरिका या खेळाडूंचा समावेश होता.   काही दिवसांपूर्वी झालेल्या जागतिक स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रज्ञाननंदाला उप विजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. १८ वर्षीय भारतीय खेळाडूला वर्ल्ड चॅम्पियन मॅग्नेस कार्लसनने टाय ब्रेकर लढतीत १.५ - ०.५ असे पराभूत केले होते. 

टॅग्स :R Praggnanandhaaआर प्रज्ञाननंदाChessबुद्धीबळ