कोटलावरील उपांत्य लढत अडचणीत!

By Admin | Updated: March 22, 2016 02:52 IST2016-03-22T02:52:10+5:302016-03-22T02:52:10+5:30

टी-२० विश्वचषकातील सेमी फायनल लढत येथील फिरोजशाह कोटला मैदानावर होणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे.

Quarterly batting with struggles! | कोटलावरील उपांत्य लढत अडचणीत!

कोटलावरील उपांत्य लढत अडचणीत!

नवी दिल्ली : टी-२० विश्वचषकातील सेमी फायनल लढत येथील फिरोजशाह कोटला मैदानावर होणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे. दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट संघटनेकडे (डीडीसीए) ओल्ड क्लब हाऊसचे ‘कम्प्लिशन सर्टिफिकेट’ नसल्याने दिल्ली हायकोर्टाने सामन्यासाठी कुठलीही सूट देण्यास नकार दिला आहे.
डीडीसीएने आरपी मेहरा ब्लॉकसाठी प्रमाणपत्र मिळविण्याची अट दक्षिण दिल्ली महानगरपालिकेने ठेवली होती. यावर डीडीसीएने हायकोर्टात याचिका दाखल केली. सोमवारी याचिकेवर सुनावणीच्यावेळी न्या. ए. के. पाठक यांनी डीडीसीएशी संबंधित प्रकरणे खंडपीठाकडे प्रलंबित असल्याचे सांगून ही याचिकादेखील खंडपीठाकडे वळविली.
डीडीसीएला कम्प्लिशन सर्टिफिकेट मिळेपर्यंत सामन्याच्या आयोजनाची परवानगी देणार नाही, असे पीठाने नमूद केले. डीडीसीएतर्फे ज्येष्ठ वकील संदीप सेठी आणि राजीव नायर यांनी आपल्या युक्तिवादात मेहरा ब्लॉक १९९६ पासून अस्तित्वात असून यासाठी ताबा प्रमाणपत्र आधीच देण्यात आल्याचे पीठाला सांगितले होते.
सेठी म्हणाले, ‘‘सेठी ब्लॉकबाबत व्यक्त केलेली चिंता ही सेवानिवृत्त न्या. मुकुल मुदगल यांचा दृष्टिकोन असू शकतो. यामुळे आयसीसी डीडीसीएला स्पष्टीकरण मागू शकते. यावर पीठाने सांगितले, ‘तुमचा आर.पी. मेहरा ब्लॉक मान्यताप्राप्त योजनेरूप नाही.’
डीडीसीएच्या संचालनासाठी हायकोर्टाने नेमलेल्या न्या. मुकुल मुदगल यांनी डीडीसीएला दोन हजार प्रेक्षक क्षमता असलेल्या मेहरा ब्लॉकची तिकीट विक्री करू नये. (वृत्तसंस्था)

Web Title: Quarterly batting with struggles!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.