पी़ व्ही़ सिंधू उपांत्यपूर्व फेरीत

By Admin | Updated: November 27, 2014 00:50 IST2014-11-27T00:50:40+5:302014-11-27T00:50:40+5:30

भारताची अनुभवी बॅडमिंटनपटू आणि गतविजेती पी़ व्ही़ सिंधू हिने मकाऊ ग्रां़प्री़ गोल्ड बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला़

PV Sindhu in quarter-finals | पी़ व्ही़ सिंधू उपांत्यपूर्व फेरीत

पी़ व्ही़ सिंधू उपांत्यपूर्व फेरीत

मकाऊ : भारताची अनुभवी बॅडमिंटनपटू आणि गतविजेती पी़ व्ही़ सिंधू हिने मकाऊ ग्रां़प्री़ गोल्ड बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला़ पुरुष गटात एच़ एस़ प्रणय आणि बी़ साई प्रणीत यांनी आगेकूच केली़
जागतिक क्रमवारीत 1क्व्या स्थानावर विराजमान असलेल्या सिंधूने अध्र्या तासापेक्षाही कमी वेळेत चिनी तैपेईच्या हुंग शीह हान हिचा 21-19, 21-15 असा पराभव करून सहज उपांत्यपूर्व फेरीत मजल मारली़
द्वितीय मानांकनप्राप्त भारताच्या सिंधूने यापूर्वी 2क्11मध्ये व्हिएतनामच्या ग्रां़प्री़ ओपनमध्येही हानवर मात केली होती़ आता उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत सिंधू इंडोनेशियाच्या लिंडावेनी फानेत्रिशी झुंजणार आह़े
भारताचे प्रणय आणि साई प्रणीत पुरुष एकेरीच्या अंतिम 16 खेळाडूंत जागा मिळविण्यात यशस्वी ठरल़े सप्टेंबरमध्ये झालेल्या इंडोनेशिया मास्टर्सचा किताब आपल्या नावे करणा:या तृतीय मानांकित 
प्रणयने इंडोनेशियाच्या आंद्रे मार्टिनवर 21-18, 21-16 असा विजय मिळविला़ 
तर, आठवे मानांकनप्राप्त साई प्रणीत याने सिंगापूरच्या रोनाल्ड सुशीलोचे आव्हान 21-15, 21-18 असे मोडून काढल़े प्रणयला आता तिस:या फेरीत चिनी तैपेईच्या लिन यू सिएनशी झुंज द्यावी लागेल, तर प्रणीत इंडोनेशियाच्या सोनी ड्वी कुनकोरोचा सामना करणार आह़े (वृत्तसंस्था)

 

Web Title: PV Sindhu in quarter-finals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.