पी.व्ही. सिंधूसोबत करार करण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
By Admin | Updated: August 26, 2016 21:07 IST2016-08-26T21:07:13+5:302016-08-26T21:07:13+5:30
रियो आॅलिम्पिकमध्ये पदक पटकावणारी पी.व्ही. सिंधू हिच्यासोबत करार करण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा सुरू आहे. स्टार बॅडमिंटनपटूसोबत करार करून आपली ब्रॅण्ड व्हॅल्यु वाढवण्यासाठी

पी.व्ही. सिंधूसोबत करार करण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
ऑनलाइन लोकमत
हैदराबाद, दि. 26 - रियो आॅलिम्पिकमध्ये पदक पटकावणारी पी.व्ही. सिंधू हिच्यासोबत करार करण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा सुरू आहे. स्टार बॅडमिंटनपटूसोबत करार करून आपली ब्रॅण्ड व्हॅल्यु वाढवण्यासाठी अनेक कंपन्या प्रयत्न करत आहेत.
आॅलिम्पिकमध्ये पदक मिळवल्याने सिंधूची ब्रॅण्ड व्हॅल्यू वाढली आहे. काही कंपन्या तिच्यासोबत लवकर करार करुन त्याची घोषणा करतील. सिंधुच्या ब्रॅण्ड व्यवस्थापनाचे संचालक रामकृष्णन आर. म्हणाले की, काही करार हे आॅलिम्पिक स्पर्धेच्या आधीच करण्यातआले होते. मात्र स्पर्धेच्या तयारीत सिंधू व्यस्त असल्याने घोषणा करण्यात आली नाही.
आॅलिम्पिकआधी दोन ब्रॅण्ड सोबत करार झाला होता. मात्र स्पर्धेच्या तयारीमुळे घोषणा करता आली नाही. आता आम्ही सप्टेंबरच्या दुसऱ्या अठवड्यात याची घोषणा होऊ शकते.’’ रामकृष्ण यांचीच कंपनी किदाम्बी श्रीकांत याचे देखील काम पाहते.
ते म्हणाले की,‘‘ सिंधुसाठी आम्हाला अनेक प्रस्ताव मिळाले आहेत. मात्र ब्रॅण्ड बनण्यासाठी वेळ लागतो. मात्र आम्ही हळु हळु पुढे जात आहोता. आता सिंधुची ब्रॅण्ड व्हॅल्यु वाढवणे गरजेचे आहे.’’
व्यावसायीक रणनिती विशेषज्ञ हरीष बिजूर म्हणाले की, आॅलिम्पिकनंतर सिंधूची ब्रॅण्ड व्हॅल्यु दो कोटीपर्यंत पोहचली आहे. ज्यात वेगवेगळ््या राज्य सरकारांनी रोख पुरस्कार देऊन आणखी वाढ केली.
ते म्हणाले की, राज्य सरकारने सिंधूला पाच कोटी रुपये दिले आहेत. याचा अर्थ आहे की, ब्रॅण्ड व्हॅल्यु आणखी वाढली आहे. आॅलिम्पिकनंतर सिंधूची ब्रॅण्ड व्हॅल्यु २० ते ३० लाख रुपयांपासून दोन कोटी रुपयांपर्यंत पोहचली आहे.