आक्रमक खेळ करण्याची पंजाबची रणनीती
By Admin | Updated: September 17, 2014 23:06 IST2014-09-17T23:06:49+5:302014-09-17T23:06:49+5:30
आयपीएलच्या सातव्या पर्वातील उपविजेता किंग्स इलेव्हन पंजाबला चॅम्पियन्स लीग टी-2क् च्या सलामीला गुरुवारी ऑस्ट्रेलियाच्या होबर्ट हरिकेन संघाचे आव्हान असेल.

आक्रमक खेळ करण्याची पंजाबची रणनीती
मोहाली : आयपीएलच्या सातव्या पर्वातील उपविजेता किंग्स इलेव्हन पंजाबला चॅम्पियन्स लीग टी-2क् च्या सलामीला गुरुवारी ऑस्ट्रेलियाच्या होबर्ट हरिकेन संघाचे आव्हान असेल. ‘ब’ गटाच्या या लढतीत आक्रमक खेळाच्या बळावर विजय मिळविण्याचे डावपेच पंजाबने आखले आहेत.
किंग्स पंजाब प्रथमच चॅम्पियन्स लीगमध्ये खेळतो आहे. जॉर्ज बेली याच्या नेतृत्वाखालील या संघाची भिस्त स्वत: बेलीसह ग्लेन मॅक्सवेल आणि मिशेल जॉन्सन यांच्यावर असेल. भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू संजय बांगर याच्या मार्गदर्शनात तयार झालेल्या या संघाकडे वीरेंद्र सेहवाग, डेव्हिड मिलर, रिद्धिमान साहा, मनन वोहरा हे आक्रमक फलंदाज आहेत. गोलंदाजीची धार मात्र कमी झालेली दिसते कारण क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून अद्याप मंजूरी मिळाली नसल्याने जॉन्सनच्या खेळण्याविषयी संभ्रम आहे. जॉन्सनशिवाय गोलंदाजीसाठी अक्षर पटेल, लक्ष्मी पती बालाजी आणि लंकेचा तिसारा परेरा यांचा पर्याय उपलब्ध आहे.
आयपीएल-7 मध्ये 14 सामन्यात 17 बळी घेणा:या जॉन्सनबाबत बांगर म्हणाला,‘ आम्ही जॉन्सनला मंजूरी मिळण्याच्या प्रतिक्षेत आहोत. मंजूरी मिळाली नाही तरी आमच्या संघात जबाबदारी ओळखून खेळणारे अनेक खेळाडू आहे. जॉन्सन खेळणार असेल तर उत्तम पण तो खेळला नाहीच तर अन्य पर्याय उपलब्ध आहेत.’
होबर्ट हरिकेन्सला देखील आपल्या खेळाडूंकडून ब:याच आशा आहेत. हरिकेन्सचे कोच डेमियन राईट म्हणाले,‘ आम्ही पहिल्यांदा क्लब आणि संघ म्हणून चॅम्पियन्स लीग खेळण्यास उत्सुक आहोत. आयपीएलचा अनुभव असलेले आमच्या संघात बरेच खेळाडू आहेत.’ टिम पेन याच्या नेतृत्वाखालील हरिकेन्स संघात डग बोलिजंर, बेन हिल्फेन्हास, पाकचा माजी कर्णधार शोएब मलिक आणि ङोव्हियर डोहर्टी आदींचा समावेश आहे.(वृत्तसंस्था)
जखमी जॉन्सनची माघार !
मेलबोर्न: वेगवान गोलंदाज मिशेल जॉन्सन याच्या छातीला मार लागल्याने तो चॅम्पियन्स लीगमध्ये किंग्स इलेव्हन पंजाबकडून खेळणार नसल्याचे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने बुधवारी स्पष्ट केले. ङिाम्बाब्वेविरुद्ध वन डे दरम्यान जॉन्सनच्या पासळीला मार लागला होता. त्याने गोलंदाजीतून ब्रेक घेतला असून जखमेवर उपचार सुरू आहेत. तो पूर्णपणो तंदुरुस्त झाला नसून पुढील आठवडय़ात फिटनेस चाचणी घेतली जाईल. वैद्यकीय सल्ल्यामुळे जॉन्सनला पंजाबकडून खेळण्याची परवानगी नाकारण्यात आल्याचे सीएचे महाव्यवस्थापक पॅट हॉवर्ड यांनी सांगितले.