पंजाबचा दिल्लीवर ९ धावांनी विजय

By Admin | Updated: May 7, 2016 23:49 IST2016-05-07T23:44:49+5:302016-05-07T23:49:11+5:30

आयपीएलच्या नवव्या पर्वात दिल्ली डेअरडेव्हिल्स विरुद्धच्या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबने ९ धावांनी विजय मिऴविला. या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबने दिलेल्या १८२ धावांचा पाठलाग

Punjab beat Delhi by 9 runs | पंजाबचा दिल्लीवर ९ धावांनी विजय

पंजाबचा दिल्लीवर ९ धावांनी विजय

>ऑनलाइन लोकमत -
मोहाली, दि. 07 - आयपीएलच्या नवव्या पर्वात  दिल्ली डेअरडेव्हिल्स विरुद्धच्या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबने ९ धावांनी विजय मिऴविला. या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबने दिलेल्या १८२ धावांचा पाठलाग करताना दिल्ली डेअरडेव्हिल्सला २० षटकात पाच गड्यांच्या मोबदल्यात १७२ धावा करता आल्या. यामध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सचा फलंदाज डि कॉकने जास्त धावा कुटल्या. त्याने ३० चेंडूत दोन षटकार आणि सहा चौकार लगावत ५२ धावा केल्या. तर, संजू सॅमसनचे अर्धशतक हुकले. त्याने ४९ धावा केल्या. वरुण नायर (२३), सॅम बिलिंग्स (६), कार्लोस ब्रेथवेट(१२) आणि ख्रिस मॉरिस नाबाद १७ व रिषभ पंतने नाबाद चार धावा केल्या. 
सामन्याच्या सुरुवातीला दिल्ली डेअरडेव्हिल्सने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. किंग्ज इलेव्हन पंजाबने बचावात्मक खेळ करत चांगली सुरुवात केली होती. किंग्ज इलेव्हन पंजाबने २० षटकात पाच गड्यांच्या मोबदल्यात १८१ धावा केल्या होत्या. यात स्टोनिस आणि साहाने प्रत्येकी ५२ धावा केल्या. दिल्लीने केलेल्या सुमार क्षेत्ररक्षणामुळे पंजाबच्या फलंदाजांना जीवनदानदेखील मिळाले. दिल्लीकडून झहीऱ खान आणि मोहम्मद शामीने प्रत्येकी एक एक विकेट घेतली तर मॉरीसने २ विकेट्स घेतल्या. 

Web Title: Punjab beat Delhi by 9 runs