पुणे खेळपट्टी खराब : ब्रॉड

By Admin | Updated: March 1, 2017 00:09 IST2017-03-01T00:09:43+5:302017-03-01T00:09:43+5:30

आयसीसी मॅच रेफ्री ख्रिस ब्रॉड यांनी भारत व आॅस्ट्रेलिया यांच्यादरम्यान पुणे येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यातील खेळपट्टीला ‘खराब’ मानांकन दिले आहे.

Pune pitches poor: Broad | पुणे खेळपट्टी खराब : ब्रॉड

पुणे खेळपट्टी खराब : ब्रॉड


नवी दिल्ली : आयसीसी मॅच रेफ्री ख्रिस ब्रॉड यांनी भारत व आॅस्ट्रेलिया यांच्यादरम्यान पुणे येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यातील खेळपट्टीला ‘खराब’ मानांकन दिले आहे. येथे पाहुण्या संघाने तीन दिवसांमध्ये विजय साकारला होता.
आयसीसीने स्पष्ट केले की, हा अहवाल बीसीसीआयला पाठविण्यात आला असून त्यांना उत्तर देण्यासाठी १४ दिवसांचा कलावधी देण्यात आला आहे. मालिकेतील पहिल्या लढतीचा निकाल अपेक्षेनुसार नव्हता. त्यात आॅस्ट्रेलियाने भारताचा ३३३ धावांनी पराभव करीत यजमान संघाची १९ सामन्यांपासून अपराजित राहण्याची मालिका खंडित केली.
आयसीसीने म्हटले आहे की, ‘आयसीसी खेळपट्टी व बाह्य मैदान यावर लक्ष ठेवण्याच्या नियम ३ च्या अंतर्गत ब्रॉड यांनी आापला अहवाल आयसीसीला सोपविला आहे. त्यात खेळपट्टीच्या दर्जाबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे.’
बीसीसीआयच्या उत्तराची
समीक्षा आयसीसीचे क्रिकेट महाव्यवस्थापकज्योफ अलार्डिस व आयसीसी मॅच रेफ्री एलिट पॅनलचे रंजन मदुगले करतील. मॅच रेफ्रीने भारतातील खेळपट्टीवर प्रश्न उपस्थित करण्याचा हा पहिलाच प्रसंग नाही. डिसेंबर २०१५ मध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यादरम्यान नागपूरमध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी असलेल्या खेळपट्टीलाही मॅच रेफ्रीने खराब असल्याचा शेरा दिला होता. त्या वेळीही तीन दिवासांमध्ये सामना संपला होता आणि भारताने १२४ धावांनी विजय मिळवित चार सामन्यांच्या मालिकेत २-० ने आघाडी घेतली होती.
>आयसीसी मॅच रेफ्री ख्रिस ब्रॉड यांचा शेरा
पुण्यातील खेळपट्टीवर चेंडू पहिल्या दिवसापासून वळत होता, पण येथे खेळणे अशक्य नव्हते. कारण, आॅस्ट्रेलिया दोन्ही डावांमध्ये २५० पेक्षा अधिक धावा करण्यात यशस्वी ठरला. भारताला मात्र दोन्ही डावांत एकूण ७४ षटकेही फलंदाजी करता आली नाही.

Web Title: Pune pitches poor: Broad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.