शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
2
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
3
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
4
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
5
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
6
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
7
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
8
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
9
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
10
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
11
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
12
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
13
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
14
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
15
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
16
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
17
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
18
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
19
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
20
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?

खरी 'फायटर'! भारताच्या लेकीनं रचला इतिहास; देश गाढ झोपेत असताना गाठले यशाचे शिखर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2024 08:04 IST

Puja Tomar vs Dos Santos : पूजा तोमर UFC मध्ये बाउट जिंकणारी पहिली भारतीय बनली आहे.

Puja Tomar UFC Record : संपूर्ण देश गाढ झोपेत असताना भारताच्या लेकीने ऐतिहासिक कामगिरी केली. मूळची उत्तर प्रदेशातील असलेली पूजा तोमर UFC मध्ये बाउट जिंकणारी पहिली भारतीय बनली आहे. कधीकाळी लहान कपडे घातल्यामुळे समाजाचे टोमणे ऐकलेल्या पूजाने तिच्या या यशाने सर्वांना प्रत्युत्तर दिले. अनेकदा तिने तिचा संघर्ष मांडताना या बाबी सांगितल्या आहेत. भारताची पहिली महिला MMA फायटर पूजा तोमरने इतिहास रचला. सायक्लोन म्हणून सर्वदूर ख्याती असलेल्या भारताच्या पूजाने ब्राझीलच्या खेळाडूचा पराभव केला. (Puja Tomar Creates History) 

क्रीडा क्षेत्रात ऐतिहासिक कामगिरी करताना पूजा तोमर UFC मध्ये बाउट जिंकणारी पहिली भारतीय बनली. तिने केंटकी येथील UFC कॅनोनियर-इमावोव्ह येथे महिलांच्या स्ट्रॉवेट विभागात ब्राझीलच्या रायने डॉस सँटोसचा पराभव केला.  तिने ९ जून रोजी यूएफसीमध्ये पदार्पण केले. 

दरम्यान, पूजा तोमरने ऑक्टोबर २०२३ मध्ये UFC सोबत तिच्या करारावर स्वाक्षरी केली होती. केंटकी येथे झालेल्या लढतीत तिने ब्राझीलच्या खेळाडूला पराभवाची धूळ चारली. पूजाच्या आधी अंशुल जुबली आणि भरत कंडारे यांनी UFC मध्ये जागतिक मंचावर भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. पण, कोणालाच जेतेपद जिंकता आले नव्हते. मात्र, पूजाने ऐतिहासिक यश मिळवले आणि UFC मध्ये बाउट जिंकण्याचा मान पटकावला. 

पूजा तोमर कोण आहे?जागतिक पातळीवर भारताचा डंका वाजवणारी पूजा तोमर ही मूळची उत्तर प्रदेशातील आहे. ती आतापर्यंत पाचवेळा राष्ट्रीय वुशू चॅम्पियन राहिली आहे. पूजाने २०१२ पासून MMA फायटिंगला सुरुवात केली आणि यशाचे शिखर गाठले. २०२२ मध्ये MFN स्ट्रॉवेट जेतेपद जिंकण्यापूर्वी तिने सलग चार विजय मिळवण्याची किमया साधली. ग्रामीण भागातून आलेल्या पूजाला सुरुवातीच्या काळात अनेक अडचणींचा सामना करावा लागला. शॉर्ट्स कपडे परिधान केल्यामुळे अनेकांनी तिला टोमणे मारले. पण, आता तिने टीकाकारांना तिच्या यशाने उत्तर दिले आहे.

टॅग्स :IndiaभारतInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी