प्रो कबड्डी : यु मुंबाला पहिला धक्का; जयपूरचा विजय
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2019 21:12 IST2019-07-22T21:11:49+5:302019-07-22T21:12:59+5:30
मुंबाला जयपूर पिंक पँथर्सने 42-23 असे पराभूत केले.

प्रो कबड्डी : यु मुंबाला पहिला धक्का; जयपूरचा विजय
हैदराबाद, प्रो कबड्डी : यु मुंबाला यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच धक्का बसला. मुंबाला जयपूर पिंक पँथर्सने 42-23 असे पराभूत केले.
सामन्याच्या सुरुवातीपासूनच पँथर्सने सामन्यावर वर्चस्व ठेवले होते. पहिल्या सत्रातही त्यांनी मुंबाला पिछाडीवर टाकले होते. पँथर्सने आक्रमण आणि बचाव या दोन्ही गोष्टींवर आपले प्रभुत्व असल्याचे दाखवून दिले.
पँथर्सने मुंबाच्या एकूण गुणांपेक्षा जास्त फक्त चढाईमध्ये मिळवले. पँथर्सने चढाईमध्ये 25 गुणांची कमाई केली, तर मुंबाला 18 गुण कमावता आले. पँथर्सने मुंबाच्या खेळाडूंच्या चांगल्या पकडीही केल्या. पँथर्सने पकडींमध्ये 11 गुण पटकावले, तर मुंबाला फक्च पाच गुण मिळवता आले. पँथर्सने यावेळी मुंबावर तीनवेळा लोण चढवले.