शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
2
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
3
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
4
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
5
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
6
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
7
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
8
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
9
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
10
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
11
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
12
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
13
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
14
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
15
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
16
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
17
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
18
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
19
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
20
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे

Pro Kabaddi League 2021-22: गुजरात, दिल्ली, पाटणाची विजयी सलामी; गिरीश एर्नाक, नवीन कुमार, मनू गोयत चमकले!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2021 8:57 PM

दुसऱ्या दिवशी पहिल्या सामन्यात गुजरातने जयपूरला, दुसऱ्या सामन्यात दिल्लीने पुण्याला आणि तिसऱ्या सामन्यात पाटणा संघाने हरयाणाला धूळ चारली.

Pro Kabaddi League 2021-22 Day 2: प्रो कबड्डीच्या आठव्या हंगामात दुसरा दिवस दमदार सामन्यांनी सुरू झाला. पहिल्या सामन्यात गुजरात जायंट्सने अखेरच्या दोन मिनिटांत मोठी आघाडी घेत जयपूरला धूळ चारली. तर दुसऱ्या सामन्यात पुणेरी पलटणला नमवत दबंग दिल्ली विजयी सलामी दिली.

गुजरातचा जयपूरवर दणकेबाज विजय (३४-२७)

गुजरातच्या संघाकडून सुरूवातीपासून आक्रमक खेळ पाहायला मिळाला होता. तर जयपूरचा संघ त्यांची आक्रमणं परतावून लावण्यात यशस्वी होत होते. हाफ टाईमपर्यंत दोन्ही संघांच्या गुणांमध्ये केवळ २ गुणांचा (१९-१७) फरक होता. त्यानंतर सामना संपायला दोन मिनीटे शिल्लक असेपर्यंत हा फरक तसाच होता. शेवटच्या काही सेकंदांच्या खेळात जयपूरच्या अर्जून देशवालने चांगले गुण कमावले. त्याने १० गुणांची कमाई केली. पण गिरीश एर्नाक आणि राकेश नरवाल यांच्या प्रत्येकी ७-७ गुणांनी गुजरातला विजय मिळवून दिला.

दबंग दिल्लीने दिली विजयी सलामी (४१-३०)

दबंग दिल्ली आणि पुणेरी पलटण यांच्यातील स्पर्धेचा इतिहास पाहता सामना रंगतदार होईल असं वाटत होतं. पण नवीन कुमारने दिल्लीचं पारडं सुरूवातीपासूनच जड ठेवलं हाफ टाईमपर्यंत दिल्लीचा संघ २२-१५ने आघाडीवर होता. त्यानंतर उत्तरार्धाच्या खेळातही पुणेरी पलटणला फारसे गुण जमवता आले नाहीत. नवीन कुमारने दमदार कामगिरी सुरू ठेवत सामन्यात १४ रेड पॉईंट्ससह १६ गुण मिळवले. त्याच्यापुढे पुणेरी पलटण अजिबातच निभाव लागला नाही.

पाटणाने शेवटच्या काही सेकंदात मारली बाजी (४२-३९)

दिवसाच्या तिसऱ्या सामन्यात चाहत्यांना थरारक खेळ पाहायला मिळाला. पाटणा पायरेट्स संघाचा हरयाणा संघाविरूद्धचा इतिहास फारसा चांगला नसूनही त्यांनी आक्रमक खेळ केला. हाफ टाईमनंतरही त्यांचा आक्रमकपणा कमी झाला नाही. असं असलं तरी हरयाणा संघाने वेळोवेळी गुण मिळत राहून कमीत कमी अंतर राखायचा प्रयत्न केला. शेवटच्या चढाईच्या वेळी तर गुण ३९-४० असे होते. त्यावेळी मनू गोयतने चढाई (रेड) करत संघाला महत्त्वपूर्ण दोन गुण मिळवून दिले आणि विजयी केले. मनूने ११ रेड पॉईंट्ससह एकूण १५ गुण मिळवले. तोच या सामन्याचा हिरो ठरला.

टॅग्स :Pro Kabaddi Leagueप्रो कबड्डी लीगPro-Kabaddiप्रो-कबड्डीPuneri Paltanपुनेरी पल्टनGujarat Fortunegiantsगुजरात सुपरजायंट्स