Pro Kabaddi League 2018 : टायटन्सकडून योद्धाची यशस्वी 'पकड'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2018 21:09 IST2018-10-13T21:08:56+5:302018-10-13T21:09:57+5:30

पहिल्या सत्रात तेलुगू टायटन्स संघाने जोरदार पकडी आणि बोनस गुण कमावत यूपी योद्धा संघावर वरचष्मा राखला. त्यामुळे तेलुगूच्या संघाला पहिल्या सत्रात १८-१३ अशी पाच गुणांची आघाडी घेता आली.

Pro Kabaddi League 2018: telugu Titans win over up yodha | Pro Kabaddi League 2018 : टायटन्सकडून योद्धाची यशस्वी 'पकड'

Pro Kabaddi League 2018 : टायटन्सकडून योद्धाची यशस्वी 'पकड'

ठळक मुद्देकर्णधार रिशांक देवाडिगा बराच काळ मैदानाबाहेर होता, त्याचबरोबर त्याला अन्य खेळाडूंची अपेक्षित साथ न मिळाल्याने त्यांना पराभव स्वीकारावा लागला.

चेन्नई : प्रो-कबड्डी लीगमधील तेलुगू टायटन्सने केलेल्या यश्स्वी पकडींच्या जोरावर त्यांनी यूपी योद्धा संघाला 34-29 असे पराभूत केले. यूपीचा कर्णधार रिशांक देवाडिगा बराच काळ मैदानाबाहेर होता, त्याचबरोबर त्याला अन्य खेळाडूंची अपेक्षित साथ न मिळाल्याने त्यांना पराभव स्वीकारावा लागला.



 

पहिल्या सत्रात तेलुगू टायटन्स संघाने जोरदार पकडी आणि बोनस गुण कमावत यूपी योद्धा संघावर वरचष्मा राखला. त्यामुळे तेलुगूच्या संघाला पहिल्या सत्रात १८-१३ अशी पाच गुणांची आघाडी घेता आली. तेलुगूच्या दोन्ही टोकाकडून चांगला बचाव पाहायला मिळाला. कर्णधारपद भूषवत असलेल्या विशाल भारद्वाजने यावेळी चांगला बचाव केला.


सामन्याच्या सुरुवातीपासून यूपीचा कर्णधार रिशांक देवाडिगा आणि राहुल चौधरी यांच्याकडून संघांना फोर मोठ्या अपेक्षा होत्या. पण या दोघांनाही लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही. पण संघातील युवा खेळाडूंना मात्र सामन्यात चांगले रंग भरले. त्यामुळेच ही लढत अटीतटीची झाली.


Web Title: Pro Kabaddi League 2018: telugu Titans win over up yodha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.