प्रो कबड्डी : बंगळुरु बुल्सची पटना पायरेट्सला धडक
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2019 22:05 IST2019-07-20T22:04:18+5:302019-07-20T22:05:26+5:30
हा सामना पकडींच्या गुणांवरच फिरल्याचे पाहायला मिळाले.

प्रो कबड्डी : बंगळुरु बुल्सची पटना पायरेट्सला धडक
हैदराबाद : प्रो कबड्डीच्या सातव्या हंगामाचा दुसरा सामना चांगलाच रंगतदार झाला. पण अखेरच्या काही क्षणांमध्ये सामन्यावर पकड कायम ठेवत बुल्सने पायरेट्सवर ३४-३२ अशी मात केली.
या सामन्यात बुल्स आणि पायरेट्स या सामन्याच चांगलीच चढाओढ पाहायला मिळाली. पायरेट्सने चढाईमध्ये बुल्सपेक्षा एक गुण जास्त कमावला. पायरेट्सने चढाईमध्ये १८ आणि बुल्सने १७ गुण कमावले. पकडीमध्ये बुल्सने १५ आणि पायरेट्सने १२ गुणांची कमाई केली. हा सामना पकडींच्या गुणांवरच फिरल्याचे पाहायला मिळाले.
तेलगु टायटन्सवर मात करत यू मुंबाची विजयी सलामी
प्रो कबड्डीच्या सातव्या हंगामाची दमदार सुरुवात यू मुंबाने केली. पहिल्याच सामन्यात यू मुंबाने तेलुगू टायटन्सवर ३१-२५ असा पराभव करत विजयी सलामी दिली.
पहिल्या सत्रात टायटन्सच्या संघाने धडाकेबाज कामगिरी करत यू मुंबावर १७-१० अशी आघाडी घेतली होती. पण दुसऱ्या सत्रात मात्र त्यांच्या हातून सामना निसटला. यू मुंबा आणि टायटन्स या दोघांनीही बचावामध्ये प्रत्येकी दहा गुण कमावले. पण चढाईमध्ये मात्र यू मुंबाचा संघ एका गुणाने वरचढ ठरला. टायटन्सने चढाईमध्ये १५ आणि यू मुंबाने १६ गुणांची कमाई केली. पण यू मुंबाने टायटन्सवर लोण चढवत चार गुणांची कमाई केली आणि बोनसचा एक गुण मिळवत त्यांनी बाजी मारली.