जोडीदाराचा निर्णय आॅलिम्पिकआधी : सानिया

By Admin | Updated: December 23, 2015 23:42 IST2015-12-23T23:42:50+5:302015-12-23T23:42:50+5:30

दुहेरीच्या जागतिक क्रमवारीतील नंबर वन महिला खेळाडू सानिया मिर्झा हिने पुढील वर्षी होणाऱ्या रिओ आॅलिम्पिकसाठी आपल्या जोडीदाराचा निर्णय खेळाच्या महाकुंभाच्या ठीक आधी घेतला जाईल

Priyanka's decision will be decided before Olympics: Sania | जोडीदाराचा निर्णय आॅलिम्पिकआधी : सानिया

जोडीदाराचा निर्णय आॅलिम्पिकआधी : सानिया

नवी दिल्ली : दुहेरीच्या जागतिक क्रमवारीतील नंबर वन महिला खेळाडू सानिया मिर्झा हिने पुढील वर्षी होणाऱ्या रिओ आॅलिम्पिकसाठी आपल्या जोडीदाराचा निर्णय खेळाच्या महाकुंभाच्या ठीक आधी घेतला जाईल, असे सांगितले.
२०१५ मध्ये एकूण १० दुहेरीचे विजेतेपद पटकावणारी सानिया मिर्झा बुधवारी येथे खासगी कार्यक्रमात पत्रकारांशी बोलताना तिने वरील वक्तव्य केले.
सानिया म्हणाली, ‘मी आता सिंगापूर येथे आयपीटीएल खेळून परतली आहे आणि गेल्या एका महिन्यापासून अद्यापपर्यंत घरीदेखील गेली नाही. सध्या माझे लक्ष्य हे वर्षातील पहिली ग्रँडस्लॅम आॅस्ट्रेलियन ओपन आहे. त्यासाठी पाच दिवसांनंतर मी मेलबोर्नला जात आहे.’ या वर्षअखेरीस महिला दुहेरीत नंबर एकवर असणारी सानिया म्हणाली, ‘‘आॅलिम्पिक अजून सात महिने दूर आहे. टेनिसमध्ये इतर खेळांप्रमाणे आॅलिम्पिकआधीच काही करावे लागते असे नाही. आॅलिम्पिकआधी माझ्यासमोर तीन ग्रँडस्लॅम आहेत. मला त्यावर लक्ष द्यायचे आहे. आॅलिम्पिकमध्ये आमची सर्वोत्तम जोडी उतरेल.(वृत्तसंस्था)

Web Title: Priyanka's decision will be decided before Olympics: Sania

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.