दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
By Admin | Updated: September 17, 2014 23:49 IST2014-09-17T23:49:44+5:302014-09-17T23:49:44+5:30
भारतीय खेळाडूंसोबत भारतीय ऑलिम्पिक महासंघ (आयओए) आणि क्रीडा मंत्रलयाचीही प्रतिष्ठा पणाला लागणार आह़े आयओएने आशियाई स्पर्धेसाठी क्रीडा मंत्रलयाकडे मोठी यादी पाठविली होती;

दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
इंचियोन : लंडन ऑलिम्पिकमध्ये पदक विजेते भारतीय खेळाडू विजय कुमार, एम़ सी़ मेरी कोम, सायना नेहवाल, योगेश्वर दत्त आणि गगन नारंगसह अन्य दिग्गज खेळाडूंकडून पदकांची अपेक्षा असल्यामुळे आशियाई स्पर्धेत त्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.
या स्पर्धेत भारतीय खेळाडूंसोबत भारतीय ऑलिम्पिक महासंघ (आयओए) आणि क्रीडा मंत्रलयाचीही प्रतिष्ठा पणाला लागणार आह़े आयओएने आशियाई स्पर्धेसाठी क्रीडा मंत्रलयाकडे मोठी यादी पाठविली होती; मात्र मंत्रलयाने या यादीला कात्री लावली होती़ त्यामुळे आयओए आणि क्रीडा मंत्रलय यांच्यात वाद झाला होता़
या वादानंतर ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता पिस्टल नेमबाज विजय कुमार, कांस्यपदक विजेती मेरी कोम, बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल, नेमबाज गगन नारंग आणि पहिलवान योगेश्वर दत्त यांची आशियाई स्पर्धेत अग्निपरीक्षा असणार आह़े योगेश्वरकडून सुवर्णपदकांची अपेक्षा आह़े तो सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आह़े या व्यतिरिक्त बॉक्सर अखिल कुमार, बॅडमिंटनपटू पी़ कश्यप, पी़ व्ही़ सिंधू, डिस्कस थ्रोअर विकास गौडा, तिरंदाज दीपिका कुमारी, स्क्वॉशपटू दीपिका पल्लिकल या अनुभवी खेळाडूंच्या कामगिरीवर नजर राहील़ (वृत्तसंस्था)
अपेक्षा मेरी कोमकडून
मेरी कोमला राष्ट्रकुल स्पर्धेसाठी पात्रता मिळविता आली नव्हती; मात्र आशियाई स्पर्धेसाठी ती पात्र ठरली आह़े लंडन ऑलिम्पिकनंतर पदकाच्या प्रतीक्षेत असलेली ही खेळाडू आगामी स्पर्धेत पदक मिळवू शकत़े
नारंगने लंडन ऑलिम्पिकमध्ये कास्याची कमाई केली होती; मात्र त्याला ग्लास्गो राष्ट्रकुलमध्ये पदकापासून दूर राहावे लागले होत़े त्यामुळे त्याच्यावर आशियाई स्पर्धेत चांगली कामगिरी करण्याचा निश्चित दबाव असेल यात शंका नाही़
सायनाने राष्ट्रकुल स्पर्धेतून माघार घेतली होती़ आता आशियाई स्पर्धेत पी़ गोपीचंदच्या मार्गदर्शनाखाली खेळण्यास तिने नकार दिला आह़े ती विमल कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली खेळेल.
भारताचा द. कोरियाकडून 1क्-क् ने धुव्वा
महिला फुटबॉल प्रकारात बुधवारी भारतीय महिला संघ यजमान द. कोरियाकडून तब्बल 1क्-क् ने पराभूत झाला.जेतेपदाचा प्रबळ दावेदार कोरियाने दोन्ही हापमध्ये प्रत्येकी पाच गोल केले. भारताचा अखेरचा सामना 21 सप्टेंबर रोजी थायलंडविरुद्ध होईल.
आशियाई खेळाची मशाल इंचियोनला पोहोचली
आशियाई खेळांची मशाल उद्घाटन समारंभाच्या दोन दिवस आधी इंचियोनला पोहोचली आह़े या मशालीचा 6 हजार किलोमीटरच्या प्रवासाचा अखेरचा टप्पा शुक्रवारी पूर्ण होणार आह़े