प्रणय, समीर, शुभंकर दुसऱ्या फेरीत

By Admin | Updated: March 16, 2017 01:14 IST2017-03-16T01:14:46+5:302017-03-16T01:14:46+5:30

गत चॅम्पियन एच. एस. प्रणयशिवाय समीर वर्मा आणि शुभंकर डे यांनी येथे स्विस ओपन ग्रांप्री बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीत दुसरी फेरी गाठली.

Prannoy, Sameer, Shubhankar in second round | प्रणय, समीर, शुभंकर दुसऱ्या फेरीत

प्रणय, समीर, शुभंकर दुसऱ्या फेरीत

बासेल (स्वित्झर्लंड) : गत चॅम्पियन एच. एस. प्रणयशिवाय समीर वर्मा आणि शुभंकर डे यांनी येथे स्विस ओपन ग्रांप्री बॅडमिंटन
स्पर्धेच्या पुरुष एकेरीत दुसरी फेरी गाठली. २४ वर्षीय प्रणयने पहिल्या फेरीत जर्मनीच्या डेव्हिड पेंग याचा २१-१५, २१-१८ असा पराभव केला. पुढील फेरीत स्कॉटलँडच्या किरन मेरिलीसशी तो दोन हात करील.
जानेवारी महिन्यात सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत आपले ग्रांप्री विजेतेपद पटकावणाऱ्या १३ व्या मानांकित समीरने हंगीरच्या गरगेली क्रोज याचा २१-१0, २१-१६ असा पराभव केला. त्याचा सामना पुढील फेरीत जपानच्या कांता सुनेयामा याच्याशी होईल.
शुभंकर याने पहिला गेम गमावल्यानंतर जोरदार मुसंडी मारताना जर्मनीच्या अ‍ॅलेक्झांडर रुवर्स याच्यावर १७-२१, २१-१७, २१-१५ असा
विजय मिळवत दुसरी फेरी गाठली. दुसऱ्या फेरीत त्याची गाठ स्लोव्हाकियाच्या इजतोस उत्रोसा याच्याशी पडेल. राष्ट्रीय चॅम्पियन सौरभ वर्मा आणि लखानी सारंग यांना मात्र पराभवाचा सामना करावा लागला.
सौरभला चुरशीच्या लढतीत डेन्मार्कच्या रासगुमस गेम्के लखानी याला कांता याच्याकडून पराभव पत्करावा लागला.

Web Title: Prannoy, Sameer, Shubhankar in second round