सचिन तेंडुलकरचा घेतला आदर्श: प्रमोद भगत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2021 06:30 AM2021-09-13T06:30:48+5:302021-09-13T06:31:32+5:30

टोकियो पॅरालिम्पीकचा सुवर्ण विजेता प्रमोद भगत याने भारताचा महान खेळाडू सचिन तेंडुलकर याची भेट घेतली.

pramod bhagat says Sachin Tendulkar role model pdc | सचिन तेंडुलकरचा घेतला आदर्श: प्रमोद भगत

सचिन तेंडुलकरचा घेतला आदर्श: प्रमोद भगत

Next

नवी दिल्ली : टोकियो पॅरालिम्पीकचा सुवर्ण विजेता प्रमोद भगत याने भारताचा महान खेळाडू सचिन तेंडुलकर याची भेट घेतली. तसेच भगत याने त्याच्या यशाचे श्रेय सचिनला देखील दिले. त्याने सांगितले की, दबावाचा कसा सामना करायचा हे सचिन तेंडुलकर याच्याकडून शिकलो आहे. 

विद्यमान विश्व विजेता भगत याने टोकियोत एसएल ३ गटात फायनलमध्ये ब्रिटनच्या डॅनियल बेथेल याला सरळ गेममध्ये पराभूत केले. चार वर्षांचा असतांना भगत याला पोलियो झाला होता. त्याने म्हटले की, मी लहानपणी क्रिकेटचे सामने पाहत असे, त्या दरम्यान मी नेहमीच सचिन याला शांत आणि एकाग्र व्यवहार करतांना बघत होतो. त्यामुळे प्रभावीत झाले. दबावात खेळण्याचे तंत्र मी त्यातूनच शिकलो.’ भगत हा ओडिशाच्या बरगढचा रहिवासी आहे.

Web Title: pramod bhagat says Sachin Tendulkar role model pdc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app