प्रदीपची ऐतिहासिक कामगिरी
By Admin | Updated: November 11, 2014 02:12 IST2014-11-11T02:12:48+5:302014-11-11T02:12:48+5:30
पय्याडे एससी संघाचा फिरकीपटू प्रदीप साहूने अप्रतिम मारा करीत कांगा लीग स्पर्धेत बलाढय़ एमआयजी सीसी विरुद्ध एका डावात सर्वच्या सर्व 1क् गडी बाद करण्याचा पराक्रम केला.

प्रदीपची ऐतिहासिक कामगिरी
मुंबई : पय्याडे एससी संघाचा फिरकीपटू प्रदीप साहूने अप्रतिम मारा करीत कांगा लीग स्पर्धेत बलाढय़ एमआयजी सीसी विरुद्ध एका डावात सर्वच्या सर्व 1क् गडी बाद करण्याचा पराक्रम केला. विशेष म्हणजे कांगा लीग स्पर्धेत असा पराक्रम करणारा प्रदीप केवळ चौथा गोलंदाज ठरला.
मूळचा हरियाणाचा असलेल्या प्रदीपने वयाच्या 16व्या वर्षी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. यानंतर या 28वर्षीय खेळाडूने हरियाणाकडून 13 प्रथम श्रेणी आणि 15 अ गटातील सामने खेळताना अनुक्रमे 13 व 7 विकेट्स घेतले. सोमवारी एमआयजी विरुद्ध झालेल्या सामन्यात प्रदीपने एकहाती वर्चस्व गाजवताना प्रतिस्पर्धी फलंदाजांना आपल्या तालावर नाचवले. 29 षटकांत 1 षटक निर्धाव टाकताना प्रदीपने 1क्2 धावांच्या मोबदल्यात सर्व 1क् गडी बाद करीत एमआयजीचा डाव 251 धावांवर संपुष्टात आणला.
प्रदीपच्या या शानदार गोलंदाजीमुळे सर्वाना अनिल कुंबळेने 1999 साली दिल्ली कसोटीमध्ये पाकिस्तान विरुद्ध केलेल्या जादुई गोलंदाजीची आठवण झाली. प्रदीपच्या या लक्षवेधी कामगिरीचा पय्याडेच्या फलंदाजांना मात्र फायदा घेता आला नाही. फलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीमुळे पय्याडेचा डाव दिवसअखेर 8 बाद 197 धावांवर रोखण्यात एमआयजीला यश आले आणि सामना अनिर्णीत राहिला.
संक्षिप्त धावफलक
एमआयजी सीसी : सर्वबाद 251 धावा (ए राजाध्यक्ष 78, एस आठवले 3क्; पी साहू 1क्-1क्2) अनिर्णीत वि. पय्याडे एससी : 8 बाद 197 धावा (एम खोटे 61, ए भटकळ 56, के सिंह 34*; ओ जाधव 3-66). (क्रीडा प्रतिनिधी)
एका डावात 1क् बळी घेणारे गोलंदाज
च्1क्/2क् : व्ही. दत्त (दादर युनियन एससी वि.वि. राजस्थान एससी 1982)
च् 1क्/3क्: ए. अब्राहम (सुंदर सीसी वि.वि. सिंध हिंदूस, 1952)
च्1क्/4क्: बीएल दलाल (फोर्ट विजय सीसी वि.वि. गौड सारस्वत सीसी, 1956)