‘पॉवर हाउस’ चीन नवव्यांदा नंबर 1
By Admin | Updated: October 5, 2014 01:30 IST2014-10-05T01:30:12+5:302014-10-05T01:30:12+5:30
आकर्षक आणि लक्षवेधी शानदार सांस्कृतिक कार्यक्रमांच्या मेजवानीद्वारे 17व्या आशियाई स्पर्धेचा शनिवारी समारोप झाला.

‘पॉवर हाउस’ चीन नवव्यांदा नंबर 1
>इंचियोन : आकर्षक आणि लक्षवेधी शानदार सांस्कृतिक कार्यक्रमांच्या मेजवानीद्वारे 17व्या आशियाई स्पर्धेचा शनिवारी समारोप झाला. चीनने स्वत:चे प्रभुत्व कायम राखून सलग नवव्यांदा अव्वल स्थान कायम राखले तर भारतीय संघाला आठव्या स्थानावर समाधान मानावे लागले.
मुख्य स्टेडियममध्ये खच्चून भरलेल्या प्रेक्षकांच्या उपस्थितीत सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी सादर करण्यात आली, शिवाय रोमहर्षक करणा:या सादरीकरणानंतर आशियाई ऑलिम्पिक परिषदेचे अध्यक्ष (ओसीए) शेख अहमद फहाद अल सबाह यांनी स्पर्धा संपल्याची अधिकृत घोषणा केली. 45 देशांमधील खेळाडूंनी 36 क्रीडा प्रकारांत चढाओढ केल्यानंतर आज ओसीएचा ध्वज खाली आणण्यात आला. पाठोपाठ आशियाई स्पध्रेचे अधिकृत गाणो सादर झाले. अव्वल स्थान कायम राखणा:या चीनला 151 सुवर्णासह 342 पदकांची कमाई झाली, तरीही ग्वांग्झू आशियाई स्पध्रेच्या तुलनेत 48 पदके कमी आहेत. समारोपाच्या कार्यक्रमाची दोन भागांत विभागणी करण्यात आली होती. सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण सुरू असताना विविध देशांचे खेळाडू एकाच वेळी मैदानात आले. यामागे ‘वन आशिया’ ही भावना दर्शविण्यात आली.
समारंभाच्या पहिल्या टप्प्यात कोरियाची राष्ट्रीय नृत्य कंपनी रेनबो कोएर यांच्या नृत्यापाठोपाठ कोरियातील पारंपरिक मार्शल आर्ट तायक्वांडोचे सादरीकरण झाले. यानंतर ड्रमर्स यांनी रंगत भरली. यादरम्यान आशियातील शांततेसाठी प्रार्थना करणा:या गीताचे सादरीकरण झाले. या वेळी उपस्थित असलेल्या अतिविशिष्ट व्यक्तींमध्ये कोरियाचे पंतप्रधान जुंग होंगवोन, आशियाई स्पध्रेचे आयोजन समितीचे अध्यक्ष किंग यंगसू, आशियाई ऑलिम्पिक परिषदेचे अध्यक्ष सबा, कोरियाच्या ऑलिम्पिक समितीचे प्रमुख किम जंघायेंग आणि इंचियोन शहराचे महापौर जियोंगबोक यांचा समावेश होता.
स्टेडियममधील मोठय़ा स्क्रीनवर स्पर्धेतील ठळक वैशिष्टय़ांसह जय-पराजयाच्या स्मृती जागविण्यात आल्या. यादरम्यान यजमान देशाच्या पदक विजेत्यांचे आगमन होताच टाळ्यांचा पाऊस पडला. मोस्ट व्हॅल्युएबल खेळाडूचा सॅमसंग पुरस्कार जपानचा जलतरणपटू कोसुके हॅगिनो (चार वैयक्तिक सुवर्णपदके) याला देण्यात आला. 18व्या आशियाडचा यजमान असलेल्या इंडोनेशियाचा ध्वज फडकविण्यात आल्यानंतर 2क्18 साली जकार्ता येथे होणा:या या स्पर्धेच्या आयोजकांना ओसीएचा ध्वज आणि मशाल सोपविण्यात आली. पुढील यजमानांनीदेखील संगीत आणि नृत्याचा नजराणा सादर केला. 19 सप्टेंबर रोजी प्रज्वलित करण्यात आलेली क्रीडाज्योत मंदावताच चोहीकडे फटाक्यांची गगनभेदी आतशबाजी डोळे दीपविणारी होती. खेळाडूंनी स्टेडियम सोडायला सुरुवात करताच ‘थँक्स यू इंचियोन.. वूई विल मीट अगेन इन जकार्ता.. ’ या आश्वासनासह स्पर्धेची सांगता झाली. (वृत्तसंस्था)
45 देशांमधील खेळाडूंनी 36 क्रीडा प्रकारात चढाओढ केल्यानंतर ओसीएचा ध्वज खाली आणला.
चीनला 151 सुवर्णासह 342 पदकांची कमाई झाली. ग्वांग्झू आशियाडच्या तुलनेत 48 पदके कमी आहेत.