भारत-इंग्लंड मालिकेत ‘डीआरएस’ची शक्यता
By Admin | Updated: October 15, 2016 01:36 IST2016-10-15T01:36:30+5:302016-10-15T01:36:30+5:30
इंग्लंडविरुद्ध देशात खेळल्या जाणाऱ्या आगामी मालिकेत बीसीसीआय पंचांच्या निर्णयाची समीक्षा प्रणालीचा (डीआरएस) वापर करण्याची दाट शक्यता

भारत-इंग्लंड मालिकेत ‘डीआरएस’ची शक्यता
नवी दिल्ली : इंग्लंडविरुद्ध देशात खेळल्या जाणाऱ्या आगामी मालिकेत बीसीसीआय पंचांच्या निर्णयाची समीक्षा प्रणालीचा (डीआरएस) वापर करण्याची दाट शक्यता आहे. यावर गंभीर विचार होत असल्याने बोर्डाचे हे पाऊल आपल्याच निर्णयापासून फारकत घेतल्याचे मानले जात आहे.
डीआरएसचा वापर झाल्यास भारत द्विपक्षीय मालिकेत पहिल्यांदा अशा प्रकारच्या तंत्राचा वापर करणारा देश ठरेल. मागच्यावेळी आयसीसी विश्वचषक २०११ च्यावेळी या तंत्राचा भारतात वापर झाला होता.
आयसीसीच्या प्रवक्त्याने या संदर्भात माहिती देताना सांगितले की, आयसीसीचे महाव्यवस्थापक ज्योफ अलार्डिस हे तांत्रिक साहाय्य उपलब्ध करणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांची बीसीसीआय अधिकारी आणि कोच अनिल कुंबळे यांच्यासोबत भेट घालून देतील. पुढील आठवड्यात ही चर्चा होईल. यावेळी डीआरएस सोबतच एमआयटी अभियंत्यांनी विकसित केलेल्या हॉकआय बॉल टेकिंग टेक्नॉलॉजीसंदर्भातही चर्चा होईल. कुंबळे हे आयसीसी क्रिकेट समितीचे अध्यक्ष असून, मागच्यावर्षी त्यांनी हॉक आय टेक्नॉलॉजी मॉनिटररिंग लेबॉरेटरीचा दौरा केला होता. (वृत्तसंस्था)