पोर्तुगाल स्पर्धेबाहेर

By Admin | Updated: June 27, 2014 01:44 IST2014-06-27T01:44:23+5:302014-06-27T01:44:23+5:30

अखेरच्या साखळी सामन्यात गुरुवारी पोतरुगालने घानावर 2-1 ने विजय तर साजरा केला पण विजयानंतरही त्यांना बाद फेरीपासून वंचित रहावे लागले.

Portugal out of the tournament | पोर्तुगाल स्पर्धेबाहेर

पोर्तुगाल स्पर्धेबाहेर

>घानाविरूद्ध 2-1 ने विजयी : गोलफरकाने केला घात
ब्रासिलिया : स्टार फुटबॉलपटू ािस्टीयानो रोनाल्डो याने 8क् व्या मिनिटाला नोंदविलेला गोल निर्णायक ठरल्यामुळे फिफा विश्वचषकातील जी गटात अखेरच्या साखळी सामन्यात गुरुवारी पोतरुगालने घानावर 2-1 ने विजय तर साजरा केला पण विजयानंतरही त्यांना बाद फेरीपासून वंचित रहावे लागले.
पोतरुगालला पुढील फेरी गाठण्यासाठी या सामन्यात मोठय़ा फरकाने विजय नोंदविणो क्रमप्राप्त होते तसेच दुसरीकडे जर्मनी किंवा अमेरिका यांच्यापैकी एका संघाच्या पराभवासाठी प्रार्थना करायची होती. 
सामन्यात 31 व्या मिनिटाला जोस बोए याने घानासाठी आत्मघातकी गोल करताच पोतरुगालला आघाडी मिळाली. त्यानंतर दुसरा गोल रोनाल्डोने 8क् व्या मिनिटाला केला. दरम्यान घानाकडून ग्यानने 57 व्या मिनिटाला गोल करीत संघाला बरोबरी मिळवून दिली होती. मध्यांतरार्पयतच्या खेळात तो दोनदा प्रतिस्पर्धी डी र्पयत पोहोचला देखील पण घानाचा गोलकिपर फताबू दौदा याने दोन्हीवेळा हल्ले थोपवून लावले.  19 व्या मिनिटाला त्याला पहिली संधी मिळाली होती. जाओ परेरा याने त्याला हा पास दिला होता. रोनाल्डोने त्यावर हेडर लगावला पण दौदाने हा चेंडू अलगद रोखून संकट टाळले. (वृत्तसंस्था)
 
4जर्मनीने हा सामना 1-क् ने जिंकताच पोतरुगाल तसेच अमेरिकेचे प्रत्येकी चार गुण झाले. पण गोलफरकाने माघारलेल्या पोतरुगालला पहिल्याच फेरीत स्पर्धेबाहेर व्हावे लागले. पोतरुगालला जर्मनीकडून झालेला क्-4 असा पराभव महागात पडला. यामुळे त्यांच्या विरोधात सात गोल झाले. अमेरिकेविरोधात केवळ चार गोल होऊ शकले. दोन्ही संघांनी प्रतिस्पर्धी संघांवर समान 4-4 गोल केले. 
 
जर्मनी गटात अव्वल
रेसिफे : थॉमस मुलेरने स्पर्धेतील नोंदविलेल्या चौथ्या गोलच्या जोरावर जर्मनीने गुरुवारी अमेरिका संघाची झुंज 1-क् ने मोडून काढली आणि विश्वकप फुटबॉल स्पर्धेत ‘जी’ गटात अव्वल स्थान पटकावीत बाद फेरीत धडक मारली. पराभवानंतरही अमेरिका संघ अंतिम 16 संघात स्थान मिळविण्यात यशस्वी ठरला. मुलरने 55 व्या मिनिटाला नोंदविलेला गोल निर्णायक ठरला. जर्मनीने 3 सामन्यांत 7 गुणांची कमाई केली. अमेरिका व पोर्तुगाल संघांनी प्रत्येकी 4 गुणांची कमाई केली. पण सरस गोलसरासरीच्या आधारावर अमेरिका संघ बाद फेरीसाठी पात्र ठरला. (वृत्तसंस्था)
 
4अमेरिका संघाने 4 गोल केले तर त्यांना 4 गोल स्वीकारावे लागले. पोतरुगाल संघाने 4 गोल नोंदविले, पण त्यांना 7 गोल स्वीकारावे लागले. आज खेळल्या गेलेल्या लढतीत जर्मनी संघाने सुरुवातीपासून वर्चस्व गाजवले. मध्यंतरार्पयत उभय संघांना गोलची कोंडी फोडता आली नाही. दुस:या सत्रत 55 व्या मिनिटाला मुलरने गोल नोंदवीत संघाचे खाते उघडले. मुलरचा हा विश्वकप स्पर्धेतील नवव्या सामन्यातील नववा गोल ठरला आणि अखेर हाच गोल निर्णायक ठरला. 
 
संघसामने विजय ड्रॉपराभव गो.  केलेगोल स्वी. गुण  
जर्मनी321क्727
अमेरिका3111444
पोतरुगाल3111474
घाना3क्12261

Web Title: Portugal out of the tournament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.