विश्व चॅम्पियन-शिपमध्ये पूजा गहलोदला रौप्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2019 05:23 IST2019-11-03T05:22:26+5:302019-11-03T05:23:10+5:30
जागतिक कुस्ती चॅम्पियनशिप; साजन कांस्यपदकासाठी खेळणार

विश्व चॅम्पियन-शिपमध्ये पूजा गहलोदला रौप्य
बुडापेस्ट : पूजा गहलोद (५३ किलो) हिला यूडब्ल्यूडब्ल्यू अंडर-२३ विश्व चॅम्पियन-शिपच्या फायनलमध्ये जपानच्या २०१७ च्या विश्व चॅम्पियन हारुआना ओकुनोविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. या निकालानंतर भारताला या स्पर्धेत दुसरे रौप्यपदक मिळाले. रविंदरने (६१ किलो) या आठवड्यात रौप्यपदक पटकावले होते.
तीनवेळचा विश्व ज्युनिअर चॅम्पियनशिपचा पदकविजेता साजन भानवाल(७७ किलो) उपांत्य फेरीत जपानच्या कोदाई साकुराबाविरुद्ध ४-५ ने पराभूत झाला. आता तो कांस्यपदकाच्या लढतीत खेळेल. साजनने यापूर्वी पात्रता फेरीत जेसे अलेक्सझँडर पोर्टरचा ६-० ने आणि प्री-क्वॉर्टरमध्ये अजरबेजानच्या तुनजय वाजिरजादेचा ३-१ ने पराभव केला होता. त्यानंतर स्वीडनच्या पेर-अलबीन ओलोफसनचा ६-२ ने पराभव करीत त्याने उपांत्य फेरी गाठली.
ग्रिको रोमनमध्ये अर्जुन हालाकुरकी (५५ किलो) याला उपांत्यपूव४ पेरीत रशियाच्या एमिन नारीमानोविच सेफेरशाएव्हविरुद्ध १२-१४ ने पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर रेपेचेज फेरीत त्याला संधी मिळाली. कारण त्याचा प्रतिस्पर्धी अंतिम फेरीसाठी पात्र ठरला. सुनील कुमार (८७ किलो), राजीत (६३ किलो) आणि दीपक पुनिया (१३० किलो) यांचे आव्हान संपुष्टात आले.