बंगळुरू बुल्सच्या संघात पोलंडचा कबड्डीपटू

By Admin | Updated: July 19, 2015 21:24 IST2015-07-19T21:24:25+5:302015-07-19T21:24:25+5:30

Poland's Kabaddi team in Bangalore bulls | बंगळुरू बुल्सच्या संघात पोलंडचा कबड्डीपटू

बंगळुरू बुल्सच्या संघात पोलंडचा कबड्डीपटू

>मुंबई: कबड्डी जगतामध्ये अनेक जणांनी मायकल स्पिक्जोचे नाव ऐकले नसावे़ जो पोलंडचा खेळाडू असून, तो अमेरिकेत फुटबॉल खेळतोय़ कालपासून येथे सुरु झालेल्या प्रो स्पोर्ट्स कबड्डी लीगमध्ये बंगळुरू बुल्स संघाचा सदस्य आहे़ बुल्सच्या संघाने काल बंगाल वॉरियर्सविरुद्ध कबड्डी लीगच्या दुसर्‍या सत्रातील आपल्या पहिल्याच सामन्यामध्ये मायकलला मैदानावर उतरवले नाही, मात्र बंगळुरुच्या संघाच्या विजयानंतर पोलंडचा हा खेळाडू मीडियाच्या आकर्षणाचा केंद्र बनला होता़ अखेर या खेळाशी कसा जोडला गेला यासंदर्भात विचारले असता मायकल म्हणाला, सर्वप्रथम जिज्ञासामुळे़ मी पोलंडमध्ये काही भारतीयांशी भेटलो त्यांनी मला या खेळाची माहिती दिली़ त्यांनी मला सांगितले की, याकडे बघ, हा लोकप्रिय होऊ शकतो़

Web Title: Poland's Kabaddi team in Bangalore bulls