पोद्दार संघ अंतिम फेरीत

By Admin | Updated: September 1, 2014 23:27 IST2014-09-01T23:27:42+5:302014-09-01T23:27:42+5:30

औरंगाबाद : जिल्हा क्रीडा कार्यालय व मनपा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेत १४ वर्षांखालील मुले आणि मुलींच्या गटात पोद्दार (सीबीएसई) आणि पोद्दार (आयसीएसई) या संघांनी अंतिम फेरीत प्रवेश केला़

Poddar team in final round | पोद्दार संघ अंतिम फेरीत

पोद्दार संघ अंतिम फेरीत

ंगाबाद : जिल्हा क्रीडा कार्यालय व मनपा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेत १४ वर्षांखालील मुले आणि मुलींच्या गटात पोद्दार (सीबीएसई) आणि पोद्दार (आयसीएसई) या संघांनी अंतिम फेरीत प्रवेश केला़
१४ वर्षांखालील मुलांच्या गटातील उपांत्य सामन्यात पोद्दार सीबीएसई संघाने सेंट जॉन्स हायस्कूलवर २-० असा विजय मिळविला़ विजयी संघाकडून परविंदर सोडी याने २ गोल नोंदविले़ मुलींच्या गटातील सेमीफायनलमध्ये पोद्दार आयसीएसई संघाने मोईन उल उलूम हायस्कूलवर सरशी साधली़
स्पर्धेत पंच म्हणून शेख मोबीन, मिर्झा फेरोज बेग, अर्शद सिद्दीकी, मुजफ्फर सिद्दीकी, मोहंमद सोहेल, मोहंमद शाहरुख, शेख अल्ताफ यांनी काम पाहिले़ (क्रीडा प्रतिनिधी)

Web Title: Poddar team in final round