पोद्दार, टीसीएचची आगेकूच
By Admin | Updated: August 25, 2014 22:57 IST2014-08-25T22:57:48+5:302014-08-25T22:57:48+5:30
औरंगाबाद : यंगस्टर्स जिल्हा अजिंक्यपद बास्केटबॉल स्पर्धेत पोद्दार स्कूल, गेम चेंजर्स बॉईज आणि टेंडर केअर होम या संघांनी प्रतिस्पर्धी टीमवर मात करीत स्पर्धेत आगेकूच केली़

पोद्दार, टीसीएचची आगेकूच
औ ंगाबाद : यंगस्टर्स जिल्हा अजिंक्यपद बास्केटबॉल स्पर्धेत पोद्दार स्कूल, गेम चेंजर्स बॉईज आणि टेंडर केअर होम या संघांनी प्रतिस्पर्धी टीमवर मात करीत स्पर्धेत आगेकूच केली़ एमएसएमच्या मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत मुलांच्या ड गटातील लढतीत टेंडर केअर होम प्रशालेने पोद्दार स्कूल ब संघांचा १०-२ अशा फरकाने पराभव केला़ मुलांच्या अ गटातील लढतीत गेम चेंजर्स बॉईज संघाने पोद्दार इंटरनॅशनल सीबीएसई संघावर ४५-२८ अशी मात केली़ मुलींच्या गटातील लढतीत पोद्दार इंटरनॅशनलने एमएसएम संघाला ६-५ ने धूळ चारून पुढच्या फेरीत प्रवेश केला़ मुलांच्या गटातील उप उपांत्य फेरीच्या लढतीत आता स्वाभिमान क्रीडा मंडळ आणि पोद्दार इंटरनॅशनल हे संघ आमने सामने येणार आहेत़ गेम चेंजर्स टीमला एमएसएमशी झंुज द्यावी लागणार आहे़ विवेकानंद महाविद्यालयासमोर टेंडर केअर होमचे आव्हान असणार आहे, तर देवगिरी आणि बीबीसी यांच्यात सामना रंगणार आहे़ (क्रीडा प्रतिनिधी)