Tokyo Olympics 2020: टोकियोत भारतीय चमू संचलनासाठी येताच पंतप्रधान मोदी उभे राहिले अन् टाळ्यांनी दिलं प्रोत्साहन 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2021 07:07 PM2021-07-23T19:07:19+5:302021-07-23T19:08:46+5:30

Tokyo Olympics 2020: जपानमध्ये आजपासून टोकिया ऑलिम्पिक स्पर्धेची मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. भारताचं यावेळी १२५ खेळाडूंचं पथक टोकियोला गेलं आहे.

PM Modi stands up to cheer athletes as the Indian contingent enters Olympic Stadium in Tokyo | Tokyo Olympics 2020: टोकियोत भारतीय चमू संचलनासाठी येताच पंतप्रधान मोदी उभे राहिले अन् टाळ्यांनी दिलं प्रोत्साहन 

Tokyo Olympics 2020: टोकियोत भारतीय चमू संचलनासाठी येताच पंतप्रधान मोदी उभे राहिले अन् टाळ्यांनी दिलं प्रोत्साहन 

Next

Tokyo Olympics 2020: जपानमध्ये आजपासून टोकिया ऑलिम्पिक स्पर्धेची मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. भारताचं यावेळी १२५ खेळाडूंचं पथक टोकियोला गेलं आहे. यात वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांमध्ये खेळाडू भारताचं प्रतिनिधित्व करणार आहेत. टोकिया ऑलिम्पिकच्या उदघाटनाच्या कार्यक्रमात स्पर्धेत सामील झालेल्या सर्व देशांच्या चमूचं मोठ्या दिमाखात संचलन पार पडलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील हे संचलन आपल्या निवासस्थानी टेलिव्हिजनवरुन अनुभवलं. 

विशेष म्हणजे, स्पर्धेत सामील सर्व देशांच्या पथकांचं संचलन सुरू असताना भारतीय पथक संचलनासाठी येताच पंतप्रधान नरेंद्र मोदी उभे राहिले आणि त्यांनी टाळ्यांचा प्रतिसाद देत भारतीय खेळाडूंना प्रोत्साहन दिलं. एएनआय या वृत्तसंस्थेनं मोदींचा व्हिडिओ ट्विट केला आहे. 

कोरोनामुळे यंदा पहिल्यांदाच ऑलिम्पिक स्पर्धा प्रेक्षकांविना होत आहे. भारतीय पथकांच्या संचलनाचं नेतृत्व बॉक्सिनंग चॅम्पियन मेरी कोम आणि पुरूष हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग यांनी केलं. दोघांनी भारतीय पथकाच्या ध्वजवाहकाची भूमिका पार पाडली. 

Web Title: PM Modi stands up to cheer athletes as the Indian contingent enters Olympic Stadium in Tokyo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app