पायरेट्सचा रोमांचक विजय
By Admin | Updated: August 15, 2015 02:01 IST2015-08-15T02:01:48+5:302015-08-15T02:01:48+5:30
अत्यंत एकतर्फी झालेल्या सामन्यात यजमान बंगळुरू बुल्सने आक्रमक खेळाच्या जोरावर दिल्लीची ‘दबंगगिरी’ ४०-२१ अशी तब्बल १९ गुणांनी उतरवली. या धमाकेदार विजयासह बंगळुरूने

पायरेट्सचा रोमांचक विजय
बंगळुरु : अत्यंत एकतर्फी झालेल्या सामन्यात यजमान बंगळुरू बुल्सने आक्रमक खेळाच्या जोरावर दिल्लीची ‘दबंगगिरी’ ४०-२१ अशी तब्बल १९ गुणांनी उतरवली. या धमाकेदार विजयासह बंगळुरूने गुणतालिकेत ३८ गुणांसह तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. तर दबंग दिल्ली संघ २६ गुणांसह सहाव्या स्थानी कायम आहे. तत्पूर्वी झालेल्या चुरशीच्या सामन्यात पटणा पायरेट्सने निसटता विजय मिळवताना बंगाल वॉरियर्सला ३४-३२ असे नमवले.
यजमान बंगळुरुने दिल्लीकरांना सामन्यात एकही संधी दिली नाही. आक्रमण व भक्कम बचावाच्या जोरावर बंगळुरुने मध्यंतरालाच २१-८ अशी १३ गुणांची एकतर्फी
आघाडी घेत सामन्याचे चित्र
स्पष्ट केले. यानंतर काही प्रमाणात दिल्लीने पुनरागमनाचे प्रयत्न केले खरे, मात्र बंगळुरुचा वेगवान खेळ व मोठ्या पिछाडीचे असलेले दडपण यामुळे दिल्लीकरांनी शरणागती पत्करली. धरमराज चेरालथनचा निर्णायक अष्टपैलू खेळ व अजय ठाकूर, राजेश मोंडल यांच्या आक्रमक चढाईच्या जोरावर यजमानांनी बाजी मारली. दिल्लीकडून काशिलिंग आडके, कर्णधार रवींदर पहल यांची झुंज अपयशी ठरली.
तत्पूर्वी पटणा पायरेट्सला विश्रांतीनंतर बंगालकडून कडवी झुंज मिळाली. एकवेळ सामना बंगालच्या बाजूने झुकणार, असे चिन्हे दिसत असतानाच पायरेट्सने जोरदार मुसंडी मारत सामन्यावरील पकड सोडली नाही. गुरविंदर सिंगच्या आक्रमक चढाई आणि डी. सुरेश कुमार, गिरीश एरनाक यांच्या भक्कम पकडीच्या जोरावर पायरेट्स संघाने मध्यंतराला १८-१२ असे वर्चस्व राखले होते.
(वृत्तसंस्था)