शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

कसोटीत गुलाबी युगाचा प्रारंभ

By admin | Updated: November 24, 2015 23:57 IST

तब्बल १३८ वर्षांची परंपरा असलेल्या कसोटी क्रिकेट स्पर्धेत येत्या शुक्रवारपासून (दि.२७) गुलाबी युगाची सुरूवात होत आहे.

सिडनी : तब्बल १३८ वर्षांची परंपरा असलेल्या कसोटी क्रिकेट स्पर्धेत येत्या शुक्रवारपासून (दि.२७) गुलाबी युगाची सुरूवात होत आहे. अ‍ॅडिलेडमध्ये आॅस्ट्रेलिया-न्यूझिलंड सामन्याद्वारे दिवस-रात्र कसोटी सामना खेळला जाणार असून, यात प्रथमच गुलाबी रंगाच्या चेंडूचा वापर करण्यात येणार आहे. खेळातील उत्कंठा वाढावी, कसोटी क्रिकेटला अधिकाधिक प्रेक्षक मिळावेत या साठी नवीन बदल करण्यात येत आहेत. या विषयी बोलताना क्रिकेट आॅस्ट्रेलियाचे प्रमुख सदरलँड म्हणाले, क्रिकेटला अधिक मनोरंजक बनविणे ही काळाची गरज आहे. मला सर्वप्रकारचे क्रिकेट आवडत असले, तरी माझी पहिली पसंती ही कसोटी हीच आहे. जर आत्ताच पाऊले उचलली नाही, तर कसोटी क्रिकेट संपुष्टात येईल. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) प्रमुख जहीर अब्बास यांनी बदलाचे स्वागत केले. मात्र काही खेळाडूंकडून या निर्णयाची खिल्ली उडविण्यात आली आहे. तर काहींनी गुलाबी रंगाचा चेंडू लवकर खराब होत असल्याचा आक्षेप घेतला आहे. (वृत्तसंस्था)डे-नाईट कसोटीचा प्रयोग यशस्वी होईल!आॅस्ट्रेलिया-न्यूझीलंड यांच्यात अ‍ॅडिलेड येथे गुलाबी चेंडूने डे-नाईट कसोटी होणार आहे. याबाबत नागपूर येथे बोलताना भारताचा कर्णधार विराट कोहली म्हणाला, ‘ काही खेळाडू गुलाबी चेंडूबाबत प्रतिक्रिया देत आहेत. दिवसा खेळ चांगला होईल पण फ्लडलाईट सुरू होण्याआधी सायंकाळी चेंडू पकडणे कठीण होईल, असे मत पुढे आले. पण ऐतिहासिक कसोटी यशस्वी झाल्यास हा पर्याय पुढे येईल. उभय संघ अशी ऐतिहासिक कसोटी खेळण्यास राजी झाले. डे-नाईट कसोटीची प्रथा पडल्यास क्रिकेट लोकप्रिय होण्याचे ते माध्यम ठरू शकते.’