विराटचा स्मिथच्या गर्लफ्रेंडसोबतचा फोटो व्हायरल
By Admin | Updated: March 1, 2017 15:06 IST2017-03-01T12:21:28+5:302017-03-01T15:06:08+5:30
भारतीय कर्णधार विराट कोहलीचे असंख्य फॅन्स आहेत. त्याच्या लुक्स आणि स्टाईलमुळे तरुणाईमध्ये त्याची क्रेज वाढतं आहे.

विराटचा स्मिथच्या गर्लफ्रेंडसोबतचा फोटो व्हायरल
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 1 - भारतीय कर्णधार विराट कोहलीचे असंख्य फॅन्स आहेत. त्याच्या लुक्स आणि स्टाईलमुळे तरुणाईमध्ये त्याची क्रेज वाढतं आहे. त्याच्या चाहत्यामध्ये तरुणींचे प्रमाण अधिक असते, एका महिला क्रिकेटरने तर विराटला चक्क लग्नाची मागणी घातली होती. हे आपणास माहितच आहे. सध्या सोशल मीडियावर विराट कोहलीचा एक फोटो व्हायरल होतोय ज्यामध्ये विराटसोबत ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटर स्टीव स्मिथ आणि त्याची गर्लफ्रेंड डॅनी व्हिल्सही आहे. या फोटोवर सोशल मीडियातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत.
कर्णधार विराट कोहली सध्या यशाच्या सर्वोच्च शिखरावर आहे, त्याची कामगिरी ही जगातील अनेकांना त्याचा चाहता होण्यासाठी मजबुर करते. स्मिथची गर्लफ्रेंड डॅनी एक जलतरणपटू आणि लॉची विद्यार्थिनी आहे. स्मिथ आणि डॅनी यांचा साखरपुडा झाल्याचे वृत्त आहे.
विराट कोहली, स्मिथ आणि डॅनी यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. चाहते त्याच्यावर आपल्या प्रतिक्रिया नोंदवत आहेत. भारताने पहिली कसोटी 333 धावांनी गमावली आहे. चार मार्चपासून दुसऱ्या कसोटीला सुरुवात होणार आहे.