सानिया मिर्झा - शोएब मलिकच्या बाळाचे फोटो व्हायरल...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2018 13:13 IST2018-11-03T13:00:46+5:302018-11-03T13:13:51+5:30
भारताची टेनिसपटू सानिया मिर्झा आणि पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिक या दाम्पत्याच्या घरी काही दिवसांपूर्वी बाळाचा जन्म झाला.

सानिया मिर्झा - शोएब मलिकच्या बाळाचे फोटो व्हायरल...
हैदराबाद : भारताची टेनिसपटू सानिया मिर्झा आणि पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिक या दाम्पत्याच्या घरी काही दिवसांपूर्वी बाळाचा जन्म झाला. 30 ऑक्टोबरला सानिया-शोएबला पुत्रप्राप्ती झाली आणि दोघांनी त्याचे नाव इझान मिर्झा मलिक असे ठेवले. शुक्रवारी सानियाला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला आणि लहानग्या इझानसह हॉस्पिटलबाहेर येतानाची तिचे फोटो व्हायरल झाली.
सोशल मीडियावर सानिया-शोएबच्या मुलाची बनावट फोटो पोस्ट करण्यात आली होती, परंतु शोएबने त्यावर प्रतिक्रीया देताना अद्याप आम्ही बाळाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केली नसल्याचे सांगितले होते. मात्र, शुक्रवारी सानिया आणि इझान यांची हॉस्पिटलमधून बाहेर येतानाचे फोटो व्हायरल झाली आहेत. या फोटोत इझानचा चेहरा दिसत नसला तरी त्यांना सोशल मीडियावर अधिक लाईक्स मिळत आहेत.
@MirzaSania With Her Son Izhaan
— MOVIES Updates (@moviesupdatesIn) November 3, 2018
It is already known that Sania Mirza delivered a baby boy and the Shoaib and Sania Mirza couple reportedly named the little one Izhaan. Sania has been discharged from hospital today. pic.twitter.com/PqyOFVVXbA