मार्शमुळे ‘पर्थ’चा विजय
By Admin | Updated: September 21, 2014 01:35 IST2014-09-21T01:35:40+5:302014-09-21T01:35:40+5:30
मिशेल मार्शच्या (26 चेंडूंत नाबाद 4क्) वादळी खेळीच्या बळावर चॅम्पियन्स लीग टी-2क् स्पर्धेतील थरारक लढतीत पर्थ स्कॉचर्सने दक्षिण आफ्रिकेच्या डॉल्फिन्सवर सहा गडी राखून विजय मिळविला़

मार्शमुळे ‘पर्थ’चा विजय
मोहाली : मिशेल मार्शच्या (26 चेंडूंत नाबाद 4क्) वादळी खेळीच्या बळावर चॅम्पियन्स लीग टी-2क् स्पर्धेतील थरारक लढतीत पर्थ स्कॉचर्सने दक्षिण आफ्रिकेच्या डॉल्फिन्सवर सहा गडी राखून विजय मिळविला़
डॉल्फिन्सने प्रथम फलंदाजी करताना 7 बाद 165 धावांचे आव्हानात्मक लक्ष्य उभे केल़े प्रत्युत्तरात पर्थ संघाने 19 षटकांत 3 बाद 149 अशी मजल मारली होती़ अखेरच्या षटकांत त्यांना 16 धावांची आवश्यकता होती़
अखेरच्या षटकांच्या दुस:या चेंडूंवर रॉबी फ्रीलिंकच्या चेंडूंवर एश्टन एगर बाद झाला़ तिस:या चेंडूवर दोन धावा मिळाल्या आणि चौथ्या चेंडूवर एकच धाव निघाली़ आता संघाला अखेरच्या दोन चेंडूंत 12 धावांची आवश्यकता होती़ मिशेल मार्श फ्रीलिंगच्या पाचवा चेंडूवर मिडविकेटवरून षट्कार खेचला़ त्यानंतर सहाव्या आणि अखेरच्या चेंडूवरही त्याने आकर्षक षट्कार खेचून संघाला विजय मिळवून दिला़
संक्षिप्त धावफलक :
डॉल्फिन्स : (केशन महाराज 29, क़े झोन्डो नाबाद 63़ एकूण 2क् षटकांत 7 बाद 164़ ज़े बेहरेनड्रॉफ 3/46)़ पर्थ : (क्रेग सीमन्स 48, एस़ व्हाईटमन 45, मार्श नाबाद 4क़् एकूण 2क् षटकांत 4 बाद 165़ क़े एबोट 1/25)़