३८ वर्षांनंतर पेलेंचे भव्य स्वागत
By Admin | Updated: October 11, 2015 23:49 IST2015-10-11T23:49:09+5:302015-10-11T23:49:09+5:30
किंग आॅफ फुटबॉल’ पेले यांचे ३८ वर्षांनंतर येथे पुन्हा आगमन झाल्यावर आज सकाळी विमानतळावर लोकांनी जोशात स्वागत केले

३८ वर्षांनंतर पेलेंचे भव्य स्वागत
कोलकाता : ‘किंग आॅफ फुटबॉल’ पेले यांचे ३८ वर्षांनंतर येथे पुन्हा आगमन झाल्यावर आज सकाळी विमानतळावर लोकांनी जोशात स्वागत केले. यादरम्यान त्यांची एक झलक पाहण्यासाठी क्रीडा चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते, तसेच ‘पेले, पेले’ अशा जोरदार घोषणाही क्रीडारसिकांनी दिल्या. त्यांच्या या घोषणेमुळे भावुक झालेल्या ब्राझीलच्या या ७४ वर्षीय महान खेळाडूने प्रेक्षकांना अभिवादन केले.
प्रारंभी काही चाहते आणि प्रसिद्धिमाध्यमे या दिग्गजाच्या आगमनासाठी विमानतळावर उपस्थित होते; परंतु जसे ते येण्याची वार्ता पसरली तेव्हा पेले यांची एक झलक ‘याचि देही याचि डोळा’ पाहण्यासाठी क्रीडारसिकांनी मोठ्या संख्येने एकच गर्दी केली. पेले दुबईहून आज सकाळी आठ वाजून ७ मिनिटांनी कोलकाता येथे पोहोचले. ‘गॉड आॅफ फुटबॉल’ या नावाने प्रसिद्ध असणारे पेले २४ तासांपेक्षा जास्त प्रवासानंतरही ताजेतवाने दिसत होते. (वृत्तसंस्था)