पॉल पोग्बा जगातील सर्वात महागडा फुटबॉलपटू

By Admin | Updated: August 9, 2016 07:35 IST2016-08-09T07:35:52+5:302016-08-09T07:35:52+5:30

फ्रान्सचा फुटबॉलपटू पॉल पोग्बाने इंग्लंडच्या मॅन्चेस्टर युनायटेडशी जवळपास 815 कोटी रुपयांचा करार केला आहे

Paul Pogo is the world's most expensive football player | पॉल पोग्बा जगातील सर्वात महागडा फुटबॉलपटू

पॉल पोग्बा जगातील सर्वात महागडा फुटबॉलपटू

>ऑनलाइन लोकमत - 
लंडन, दि. 9 - फ्रान्सचा फुटबॉलपटू पॉल पोग्बाने इंग्लंडच्या मॅन्चेस्टर युनायटेडशी जवळपास 815 कोटी रुपयांचा करार केला आहे.  5 वर्षांसाठी हा करार करण्यात आला आहे. या करारासोबत पॉल पोग्बा सर्वात महागडा फुटबॉलपटू ठरला आहे. गेल्या चार वर्षात पॉल पोग्बाने केलेल्या कामगिरीच्या आधारे त्याच्याशी ही करार करण्यात आला आहे. 
 
पोग्बानं कमाईच्या बाबतीत आता गॅरेथ बेल आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो यांनाही मागे टाकलं आहे. गॅरेथ बेलनं 2013 साली रिआल माद्रिदशी 740 कोटी रुपयांचा करार केला होता. मॅन्चेस्टर युनायटेडमधून आपल्या करिअरची सुरुवात कऱणा-या पॉल पोग्बाने 2012 साली पोग्बा इटलीच्या युवेंटस संघात प्रवेश केला होता. त्यावेळी पोग्बानं युवेंटसशी केवळ 7 कोटी रुपयांच्या आसपास करार केला होता. 
 

Web Title: Paul Pogo is the world's most expensive football player