Paris Paralympics 2024 : पॅरालिम्पिकमध्ये रंगली विराट कोहलीची चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2024 06:40 IST2024-09-04T06:39:53+5:302024-09-04T06:40:30+5:30
Paris Paralympics 2024 : पॅरालिम्पिक्स स्पर्धेत समालोचनदरम्यान भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीची चर्चा रंगली. बॅडमिंटन सामन्यादरम्यान एका इंग्लिश समालोचकाने म्हटले की, ‘नीतेश कुमारने सांगितले की, त्याचा आदर्श विराट कोहली आहे.

Paris Paralympics 2024 : पॅरालिम्पिकमध्ये रंगली विराट कोहलीची चर्चा
पॅरिस : येथे सुरू असलेल्या पॅरालिम्पिक्स स्पर्धेत समालोचनदरम्यान भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीची चर्चा रंगली. बॅडमिंटन सामन्यादरम्यान एका इंग्लिश समालोचकाने म्हटले की, ‘नीतेश कुमारने सांगितले की, त्याचा आदर्श विराट कोहली आहे.
कोहली भारताचा शानदार क्रिकेटपटू आहे. त्याने आधी आपल्या राष्ट्रीय संघाचे नेतृत्व केले आहे. माझ्या मते, भारतात सर्वाधिक लोक विराट कोहलीला स्पोर्टिंग हीरो म्हणून पाहतात.’ सोशल मीडियावरही याची बरीच चर्चा रंगली.