शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
3
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
4
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
5
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
6
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
7
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
8
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
9
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
10
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
11
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
12
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
13
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला! त्या अमन सेहरावतला आखाड्यात उतरण्यावर बंदी; जाणून घ्या कारण
14
पुण्यातील विठ्ठल भक्तांवर पंढरपुरात हल्ला करणारे 'ते' तिघे कोण? वाद इतका विकोपाला का गेला?
15
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन; मुंबई-पुणेकरांना मोठा दिलासा!
16
देशातल्या खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेनं दिलं खास दिवाळी गिफ्ट, आपल्याला कसा होणार फायदा? जाणून घ्या
17
प्रीमियम लूक, इंटीरियरमध्ये लक्झरी आणि स्पोर्टी टच; टोयोटा फॉर्च्यूनर लीडर भारतात लॉन्च!
18
रशियात शिकायला गेला आणि सैन्यात भरती झाला, अखेर युक्रेनी सैन्यासमोर सरेंडर, गुजराती तरुणासोबत काय घडलं? 
19
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता एकाच App मध्ये मिळणार बस, ट्रेन आणि मेट्रोचे तिकीट...
20
बॉलिवूड हादरलं! 'झुंड' फेम अभिनेत्याची निर्घृण हत्या, अर्धनग्नावस्थेत आढळला प्रियांशूचा मृतदेह

ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला! त्या अमन सेहरावतला आखाड्यात उतरण्यावर बंदी; जाणून घ्या कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 18:08 IST

या कारवाईमुळे अमन सेहरावत आता मोठ्या स्पर्धेला मुकणार

Olympic Medalists  Aman Sehrawat Has Been Banned For 1 Year By WFI : भारतीय कुस्ती महासंघाने (WFI) ऑलिम्पिक पदक विजेत्या अमन सेहरावत (Aman Sehrawat ) याच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. कुस्तीपटू अमन सेहरावत याने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला कांस्य पदकाची कमाई करुन दिली होती. एवढेच नाही तर अवघ्या २१ वर्षे २४ दिवस वयात ऑलिम्पिक पदक जिंकत त्याने इतिहास रचला होता. भारताकडून सर्वात कमी वयात ऑलिम्पिक पदक जिंकण्याचा विक्रम त्याच्या नावे आहे. इथं जाणून घेऊयात असं काय घडलं? ज्यामुळं भारतीय कुस्ती महासंघाने एवढा मोठा निर्णय घेतला त्यासंदर्भात सविस्तर

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

वजन वाढलं अन् अपात्र ठरला, लगेच निलंबनाची कारवाई

जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत लढत न खेळता स्पर्धेबाहेर पडण्याची वेळ आल्यानंतर अमन सेहरावत याच्यावर भारतीय कुस्ती महासंघानं एक वर्षाच्या निलंबनाची कारवाई केली आहे. या स्पर्धेत अमन पुरुष फ्रीस्टाइल कुस्ती प्रकारात ५७ किलो वजनी गटातून सहभागी झाला होता. लढती आधी निर्धारित वजनापेक्षा १.७ किलो अधिक वजन भरल्यामुळे तो जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेतील लढतीसाठी अपात्र ठरला होता. याच पार्श्वभूमीवर भारतीय कुस्ती महासंघाने २३ सप्टेंबरला त्याला कारणे दाखवा नोटिस पाठवले.  कुस्तीपटूनं जे उत्तर दिले ते समाधानकारक नाही, असे सांगत कुस्ती महासंघाने त्याच्यावर एक वर्षे बंदीची कारवाई केली आहे.

या कारवाईमुळे अमन सेहरावत आता मोठ्या स्पर्धेला मुकणार

कुस्ती महासंघाने दिलेल्या माहितीनुसार, कारणे दाखवा नोटीस मिळाल्यावर कुस्तीपटू अमन याने २९ सप्टेंबरला उत्तर दिले, पण अनुशासन समितीला ते समाधानकारक वाटले नाही. कुस्तीपटूने जी बाजू मांडली त्यावर परीक्षण केले.  मुख्य प्रशिक्षक आणि सहाय्यक प्रशिक्षकांना या प्रकरणात स्पष्टीकरणासाठी बोलावण्यात आले होते. त्यानंतर युवा कुस्तीपटूवर  कठोर अनुशासनात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कारवाईमुळे अमन २०२६ मध्ये होणाऱ्या  आशियाई क्रीडा स्पर्धेला मुकणार आहे. कारण ही स्पर्धा १९ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर या कालावधीत होणार आहे. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Olympic medalist Aman Sehrawat banned; Know the reason why.

Web Summary : WFI banned Olympic medalist Aman Sehrawat for one year. At 21, he won a bronze medal in Paris, becoming India's youngest Olympic medalist. Details regarding the ban are explained.
टॅग्स :Wrestlingकुस्तीparis olympics 2024पॅरिस ऑलिम्पिक २०२४