शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
....तोपर्यंत तपास यंत्रणा वकिलांना समन्स बजावू शकत नाहीत; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय
3
आता उगाच उठून सोशल मीडियावर काहीही बोलता येणार नाही! 'या' देशाने इन्फ्लुएन्सर्सबाबतीत घेतला मोठा निर्णय
4
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
5
खिशाला कात्री! स्मार्टफोन महाग होणार? AI मुळे तुम्हाला आता जास्त पैसे मोजावे लागणार
6
१ कोटी रुपयांचं घर घेण्यासाठी तुमची मिनिमम सॅलरी किती असली पाहिजे? पाहा काय म्हणताहेत एक्सपर्ट्स
7
'काँग्रेसमुळे जम्मू-काश्मीरचा एक भाग पाकिस्तानात गेला', पंतप्रधान मोदींचा घणाघात...
8
Shri Swami Samartha: घरातील देवांची मूर्ती, प्रतिमा यातील चैतन्य कसे ओळखावे? उपासना कशी वाढवावी? वाचा
9
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
10
घर घ्यायचंय? फ्लॅट घेताना स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशनचा खर्च किती येतो? कुठे होईल पैशांची बचत
11
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
12
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
13
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
14
World Cup 2025 FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
15
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
16
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
17
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
18
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
19
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
20
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग

मनू भाकरची आई आणि नीरज चोप्रा यांच्यात काय संवाद झाला? मोठा खुलासा, Video Viral

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2024 19:59 IST

Neeraj Chopra Meets Manu Bhaker Mother : मनू भाकरची आई नीरज चोप्राशी संवाद करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Neeraj Chopra Manu Bhaker : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मधील पदकविजेता नीरज चोप्रा आणि मनू भाकर प्रसिद्धीच्या झोतात आहेत. अशातच मनू भाकरची आणि नीरज चोप्राचा एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये मनूची आई नीरजचा हात डोक्यावर ठेवत असल्याचे दिसते. नेटकऱ्यांनी भलताच तर्क लावून यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. दुसरीकडे मनू आणि नीरज एकमेकांशी बोलत असल्याचाही एक व्हिडीओ समोर आला आहे. आता नीरज आणि मनूची आई सुमेधा भाकर यांच्यात झालेल्या संवादाचा खुलासा करणारा व्हिडीओ व्हायरल होऊ लागला आहे. (Neeraj Chopra Manu Bhaker News) 

नीरज चोप्रा आणि मनू भाकर या दोन्ही खेळाडूंनी पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारतासाठी पदके जिंकली आहेत. मनू भाकरने एकेरी आणि मिश्र सांघिक स्पर्धेत कांस्य पदक पटकावले. यासह एका ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी ती स्वतंत्र भारतातील पहिली खेळाडू ठरली. दुसरीकडे, नीरज चोप्रा २०२० च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये जिंकलेल्या सुवर्ण पदकाचा बचाव करू शकला नाही, परंतु त्याने ८९.४५ मीटर भालाफेक करून रौप्य पदक आपल्या नावावर केले. 

मनू भाकरची आई नीरजला सांगते की, कोणताच तणाव घेणार नाही याची शपथ घे... थोडी विश्रांती घेऊन पुन्हा तयारी सुरू ठेवशील. बेटा, तुला त्रास होईल असे काही करू नकोस. मनूची आई नीरजला आणखी काही विचारते. पण, व्हिडीओमध्ये त्यांचा स्पष्ट संवाद ऐकू येत नाही. 

दरम्यान, पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताने पाच कांस्य आणि एक रौप्य अशी एकूण सहा पदके जिंकली. मागील ऑलिम्पिकपेक्षा यंदा भारताला एक पदक कमी मिळाले. भारताची स्टार नेमबाज मनू भाकरने पदकाचे खाते उघडले. तर दुसरे पदक मनूने सरबजोत सिंगच्या साथीने जिंकले. याशिवाय पुरुषांच्या थ्री पोझिशन्स रायफल स्पर्धेत स्वप्नील कुसाळेने तिसरे स्थान मिळवून कांस्य पदकावर आपले नाव कोरले. मग भारताच्या हॉकी संघाने कांस्य पदक जिंकले, तर भालाफेकमध्ये मागील ऑलिम्पिकमधील चॅम्पियन नीरज चोप्राने रौप्य पदकाला गवसणी घातली. याशिवाय अमन सेहरावतने कुस्तीत कांस्य पदकाची कमाई केली. 

टॅग्स :paris olympics 2024पॅरिस ऑलिम्पिक २०२४Neeraj Chopraनीरज चोप्राIndiaभारतSocial Mediaसोशल मीडिया