शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

भारतीय हॉकी संघ सुवर्णपदकाचा इतिहास रचणार? जुळून आलाय १९८०चा 'तो' योगायोग

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2024 17:14 IST

Indian Hockey Team, Paris Olympics 2024: १९८०च्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने हॉकीमध्ये सुवर्णपदक मिळवले होते

Indian Hockey Team, Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीयहॉकी संघाने आतापर्यंत जबरदस्त कामगिरी केली आहे. टीम इंडिया उपांत्य फेरीत पोहोचली असून पदकापासून एक पाऊल दूर आहे. उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात भारताने ग्रेट ब्रिटनचा शूटआऊटमध्ये ४-२ असा पराभव केला. भारताच्या डिफेंडरला रेड कार्ड मिळाल्याने भारत १० खेळाडूंसह खेळत होता. तरीही निर्धारित सामन्यात भारताने १-१ अशी बरोबरी राखली. त्यामुळे सामना शूटआउटमध्ये गेल आणि भारत सामना जिंकला.

आता ६ ऑगस्टला भारतीय संघ उपांत्य फेरीच्या सामन्यात जर्मनीशी भिडणार आहे. जर्मनीने उपांत्यपूर्व फेरीत अर्जेंटिनाचा ३-२ असा पराभव केला. दुसरीकडे, पहिल्या उपांत्य फेरीत स्पेनचा सामना नेदरलँडशी होणार आहे. उपांत्यपूर्व फेरीत स्पेनने ऑलिम्पिक चॅम्पियन बेल्जियमचा ३-२ असा पराभव केला. तर नेदरलँड्सने ऑस्ट्रेलियाचा २-० असा पराभव केला.

ऑस्ट्रेलिया आणि बेल्जियम हे दोन बलाढ्य संघ पदकाच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. असा योगायोग तब्बल ४४ वर्षांनंतर घडला आहे, जेव्हा बेल्जियम किंवा ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीत नसतील. यापूर्वी १९८०च्या मॉस्को ऑलिम्पिकमध्ये असा प्रकार पाहायला मिळाला होता. ऑस्ट्रेलियाने त्यावर्षी ऑलिम्पिकवर बहिष्कार घातला होता. तर बेल्जियमचा संघ हॉकी स्पर्धेसाठी पात्रच ठरू शकला नव्हता. त्यावेळी १९८०च्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय संघ सुवर्णपदक जिंकण्यात यशस्वी ठरला होता. तसाच योगायोग आताही घडून आला आहे, त्यामुळे भारतीय संघाला सुवर्णपदकाची संधी आहे.

मॉस्को ऑलिम्पिक १९८० मध्ये पुरुष हॉकी स्पर्धेत भारताशिवाय यजमान सोव्हिएत युनियन, झेकोस्लोव्हाकिया, झिम्बाब्वे आणि स्पेन या ५ देशांनीच सहभाग घेतला होता. वासुदेव भास्करनच्या नेतृत्वाखाली भारताने अंतिम फेरीत स्पेनचा ४-३ असा पराभव केला होता. स्पेनला रौप्यपदक तर सोव्हिएत युनियनला कांस्यपदक मिळाले होते. तेव्हापासून आजपर्यंत भारताला हॉकीमध्ये सुवर्ण किंवा रौप्यपदक जिंकता आलेले नाही.

टॅग्स :paris olympics 2024पॅरिस ऑलिम्पिक २०२४HockeyहॉकीIndiaभारत