शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

Paris Olympics 2024 : "गोल्ड आणायचं आहे..."; पॅरिस ऑलिम्पिकमधून विनेश फोगाटचं आईला वचन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2024 07:58 IST

विनेश ऑलिम्पिक कुस्तीची अंतिम फेरी गाठणारी पहिली भारतीय महिला, तर सुशीलकुमार आणि रवीकुमार दहिया यांच्यानंतरची तिसरी भारतीय ठरली. यानंतर तिने आपल्या आईसोबत बोलताना सुवर्णपदक आणणार आसल्याचे म्हटले आहे...

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताची आघाडीची महिला मल्ल विनेश फोगाट हिने ५० किलो फ्री स्टाइल गटात ऐतिहासिक कामगिरी करताना दिमाखात अंतिम फेरी गाठली. मंगळवारी 6 ऑगस्टला चॅम्प-डे-मार्स एरिना मॅट बीमध्ये सेमीफाइनलच्या सामन्यात क्युबाच्या युसनेलिस गुझमन लोपेड़ाविरुद्ध ५-० असा एकतर्फी विजय मिळवत विनेश ऑलिम्पिक कुस्तीची अंतिम फेरी गाठणारी पहिली भारतीय महिला, तर सुशीलकुमार आणि रवीकुमार दहिया यांच्यानंतरची तिसरी भारतीय ठरली. यानंतर तिने आपल्या आईसोबत बोलताना सुवर्णपदक आणणार आसल्याचे म्हटले आहे...

या ऐतिहासिक विजयानंतर, विनेश फोगाट व्हिडिओ कॉलच्या माध्यमाने आपल्या आईसोबत बोलली. विनेश फोगाट आपल्या कुटुंबातील सदस्यांना फ्लाइंग किस पाठवताना भावूक झाल्याचे दिसून आले. व्हिडिओच्या शेवटच्या भागात, फोगाट, "गोल्ड आणायचे आहे!" असे म्हणताना दिसत आहे.

आता सुवर्णपदकासाठी अमेरिकेच्या साराह अॅन हिल्डेब्रेटसोबत भिडणार -आता विनेशला सुवर्णपदकासाठी अमेरिकेच्या साराह अॅन हिल्डेब्रेट हिच्याविरुद्ध भिडायचे आहे. ही लढत जिंकल्यास विनेश ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण जिंकणारी पहिली भारतीय मल्ल ठरेल. सावध सुरुवात केलेल्या विनेशने अचानकपणे आक्रमक खेळ करत लोपेझला दडपणाखाली आणली. तिच्या पायांवर आक्रमक पकड करताना विनेशने गुणांची कमाई करत सामन्यावर पकड मिळवली. मिळवलेली आघाडी अखेरपर्यंत कायम राखताना विनेशने सहज अंतिम फेरीत प्रवेश केला. त्याआधी, विनेशने जगज्जेती आणि अव्वल मानांकित जपानच्या युई सुसाकीचा ३-२ असा पराभव करत विनेशने आपल्या मोहिमेला दिमाखात सुरुवात केली होती. यानंतर तिने युक्रेनच्या आठव्या मानांकित ओसाना लिवाचला ७-५ 

पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताची कुस्तीपटू विनेश फोगाटने (Vinesh Phogat) महिलांच्या फ्रीस्टाइल 50 किलोग्रॅम कुस्तीच्या अंतिम सामन्यात ऐतिहासिक प्रवेश मिळवल्यानंतर, आपल्या आईसाठी सुवर्णपदक आणणार आसल्याचे म्हटले आहे. 

अवघ्या दहा सेकंदात फिरवला सामनाविनेशने दणक्यात आपल्या मोहिमेला सुरुवात करताना पहिल्या फेरीत जगज्जेत्या युई सुसाकी हिला नमवले. विशेष म्हणजे, गेल्या दहा वर्षात सुसाकीने केवळ तीन पराभव पत्करले आहेत. त्यामुळे तिला नमवणे विनेशपुढे अत्यंत कठीण आव्हान होते. त्यातच, सामन्यातील अखेरची १० सेकंद शिल्लक असताना विनेश ०-२ अशी पिछाडीवर होती. परंतु, येथून तिने जबरदस्त मुसंडी मारत ३-२ अशी बाजी मारली. सुसाकीला टेकडाऊन करत विनेशने दोन गुण मिळविल्यानंतर जपानी संघाने याविरुद्ध अपील केले. परंतु, रेफ्रींनी व्हिडीओ पाहिल्यानंतर हे अपील फेटाळून लावले आणि विनेशला एक अतिरिक्त आणि निर्णायक गुण मिळाला.

विनेशने २०१८मध्ये जकार्ता येथे झालेल्या आशियाई स्पर्धेत ५० किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले. ही कामगिरी करणारी ती पहिली महिला कुस्तीपटू ठरली होती.• विनेशने ग्लास्गो २०१४ (४८ किलो). गोल्ड कोस्ट २०१८ (५० किलो) आणि बर्मिंगहॅम २०२२ (५३ किलो) या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे.• जागतिक स्पर्धेत तिने २०१९ आणि २०२२मध्ये ५३ किलो वजनी गटात दोन कांस्यपदके जिंकली आहेत. अशी कामगिरी करणारी ती पहिलीच भारतीय महिला कुस्तीपटू आहे. • विनेशने आतापर्यंत जागतिक पातळीवर एकूण २६ पदके जिंकली आहेत.

ही तीच मुलगी आहे जिला दिल्लीच्या रस्त्यांवरून ओढत नेले होते. ही तीच मुलगी आहे, जिला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. आज ही मुलगी जग जिंकली पण ती भारतीय सिस्टीमसमोर हरलेली आहे.- बजरंग पुनिया

 

टॅग्स :Vinesh Phogatविनेश फोगटparis olympics 2024पॅरिस ऑलिम्पिक २०२४Wrestlingकुस्ती