शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीही होवो, सरकार शेतकरी कर्जमाफी करणारच : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
2
इंडिगोवर मोठा आर्थिक दंड लावा; डीजीसीए आणि कंपनीच्या प्रमुखांना हटवा
3
यंदा अनावश्यक गर्दी टाळणार, आजपासून हिवाळी अधिवेशन, प्रशासन सज्ज : सभापती, उपसभापतींनी घेतला आढावा
4
विमानसेवाच जमीनदोस्त ! अनेक विमानतळांवर गोंधळ सुरू, प्रवाशांचे हाल
5
विरोधी पक्षनेतेपद मुद्यावरून सत्ताधारी-विरोधक आमनेसामने; ‘मविआ’ला खुर्चीचीच चिंता असल्याची सरकारची टीका
6
महाराष्ट्रात लवकरच येणार ‘मेडिकल व्हॅल्यू टुरिझम’ योजना, सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती
7
क्रिकेटपटू स्मृती मानधना अन् पलाशचे लग्न अखेर माेडले; कुटुंबांच्या गोपनीयतेचा आदर करा : स्मृती
8
...ये दोस्ती हम नही तोडेंगे ! मोदी आणि पुतीन यांच्या भेटीकडे अमेरिका, युरोप आणि चीनचेही होते लक्ष
9
आजी-आजोबांच्या ‘स्क्रीन’च्या ‘व्यसनां’चं काय करणार?
10
गोव्यात नाइट क्लब ठरला ‘मृत्यू क्लब’; अग्नितांडवात २५ ठार; सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
11
गोवा नाइट क्लबमध्ये कशामुळे भडकली आग? 25 जणांच्या मृत्यूला कोण जबाबदार? CM सावंत यांचा मोठा खुलासा, 4 जणांना अटक
12
Bigg Boss 19: गौरव खन्नाने करुन दाखवलं! 'बिग बॉस १९'च्या ट्रॉफीवर कोरलं नाव
13
गोवा क्लबला दोन एक्झिट गेट, बाहेर पडण्यासाठी धडपडत होते लोक; यामुळे झपाट्याने पसरली आग
14
नाईट क्लब पाडण्याचे आदेश रद्द करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई; गोव्यातील दुर्घटनेनंतर पंचायत संचालकासह तिघे निलंबित
15
'बिग बॉस १९'मधून तान्या मित्तलचा प्रवास संपला; प्रणित मोरेची टॉप ३ मध्ये एन्ट्री, ट्रॉफी जिंकणार?
16
"उद्धव ठाकरे इंडिगोने फिरत नाहीत"; CM फडणवीसांचा खोचक टोला; म्हणाले,"अडचण असल्यास गाडी पाठवून देतो!"
17
मुंढवा जमीन व्यवहार प्रकरण: शीतल तेजवानीनंतर रवींद्र तारूला अटक, घरातून घेतलं ताब्यात
18
610 कोटी रिफंड, 3000 बॅग परत केल्या..., इंडिगोच्या 1650 फ्लाइट ट्रॅकवर; भाडेवाढीसंदर्भात सरकारचे कडक निर्देश 
19
नागपूर अधिवेशनात विरोधी पक्षनेता मिळणार का? CM फडणवीस म्हणाले, "आमचा विरोध नाही, पण..."
20
'बिग बॉस १९'च्या ग्रँड फिनालेला सुरुवात, वोटिंग ट्रेंडनुसार 'हा' स्पर्धक जिंकण्याची शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

कोण आहे मोना अग्रवाल? देशाला ब्राँझ मेडल मिळवून देणाऱ्या लेकीसंदर्भातील खास गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2024 16:44 IST

३७ वर्षीय पॅरा शूटर मोना अग्रवाल हिने पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये तीन प्रकारच्या  स्पर्धेत भाग घेतला आहे.

पॅरिस ऑलिम्पिक प्रमाणेच पॅरालिम्पिकमध्येही भारताने नेमबाजीतून पदकाची सुरुवात केली आहे. टोकियो ऑलिम्पिकमधील गत चॅम्पियन अवनी लखेरा हिच्यासह 10 मीटर एअर रायफल स्टँडिंग SH1 प्रकारात  मोना अग्रवालनं भारताला पदक मिळवून दिले. 

अवनीनं सेट केला नवा रेकॉर्ड, मोनानं तिसऱ्या क्रमांकावर राहत पक्क केले पदक  

अवनी लखेरा हिने टोकियो पॅरालिम्पिक २४९.६ हा रेकॉर्ड मोडित काढत २४९.७ गुणांसह नवा विक्रम प्रस्थापित केला. दुसरीकडे  मोना हिने २२८.७ गुणांसह तिसऱ्या स्थानावर राहिली. दक्षिण कोरियाच्या युनरी लीनं २४६.८  गुणांसह रौप्य पदक कमावले. 

कोण आहे मोना अग्रवाल?

राजस्थानच्या सिकर येथे जन्मलेली मोना बालपणीच पोलिओमुळे प्रभावित झाली. चालण्यातील असर्थता, शिक्षणही पूर्ण न करू शकलेल्या या तरुणीनं संघर्षावर मात करत पॅरा शूटर होण्यासाठी जयपूरला आली. आज तिने पॅरालिम्पिक स्पर्धेत देशाला पदकी कामगिरी करुन दिली आहे. उर्वरित इवेंटमध्येही ती असाच लक्षवेधी निशाणा साधेल, अशी अपेक्षा आहे.

एकूण तीन प्रकारात करणार भारताचे प्रतिनिधीत्व

३७ वर्षीय पॅरा शूटर मोना अग्रवाल हिने पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये तीन प्रकारच्या  स्पर्धेत भाग घेतला आहे. महिला १० मीटर एअर रायफल स्टँडिंग आर २ स्पर्धेत कांस्य पदक पटकवाणीर मोना मिश्र ५० मीटर रायफल प्रोन आर ६ आणि  महिला ५० मीटर रायफल ३ पोझीशन आर ८ मध्येही भारताचे प्रतिनिधीत्व करताना दिसेल. 

२०२१ मध्ये शूटिंगमध्ये आजमावला हात

व्हीलचेअरच्या आधारावर असणाऱ्या मोना अग्रवाल हिने गोळाफेक, थाळी फेक,भाला फेक आणि पॉवर लिफ्टिंग यासारख्या खेळात राज्यस्तरावर ओळख निर्माण केली. पण मैदानी खेळासाठी शरीर साथ देत नसल्यामुळे मोना हिने शूटिंगमध्ये हात आजमावण्याचा निर्णय घेतला. २०२१ मध्ये ती पॅरा शूटिंगमध्ये सक्रीय झाली होती. 

टॅग्स :Paralympic Gamesपॅरालिम्पिक स्पर्धा