शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

Tokyo Olympic : 'नशीब कधीपर्यंत रुसून राहतं, तेच पाहते'; पिस्तुल बिघडल्यानं हुकली फायनल, मनू भाकरनं वडिलांकडे मोकळं केलं मन!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2021 12:07 AM

manu bhaker tells her father after pistol malfunction at Tokyo 2020 : भारताची नेमबाज मून भाकर जिच्याकडून ऑलिम्पिक पदकाच्या अपेक्षा केल्या जात आहेत, वैयक्तिक गटात तिला अपयश आलं असलं तरी मिश्र गटात तिला संधी आहे.

manu bhaker tells her father after pistol malfunction at Tokyo 2020 : भारताची नेमबाज मून भाकर जिच्याकडून ऑलिम्पिक पदकाच्या अपेक्षा केल्या जात आहेत. रविवारी 10 मीटर एअर पिस्तुल प्रकाराच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्यात अपयश आलं. क्वालिफिकेशन फेरीत पिस्तुला तांत्रिक बिघाड झाल्यामुळे तिची 20 मिनिटे वाया गेली अन् थोड्याश्या फरकानं तिचा अंतिम फेरीतील प्रवेश हुकला. पिस्तुलात तांत्रिक बिघाड झाला तेव्हा तिला 55 मिनिटांत 44 शॉट्स मारायचे होते, परंतु तिला केवळ 36 शॉट्स मारता आले आणि त्यामुळे तिच्या गुणांत घसरण झाली.  त्यानंतर पिस्तुल व्यवस्थित काम करतेय की नाही, हेच जाणून घेण्यात तिला 4-5 मिनिटे लागली. या प्रसंगानंतर तिनं घरी फोन केला आणि वडिलांशी बोलली. ''पप्पा, बघते नशीब कधीपर्यंत माझ्यावर रुसून राहते.''

तिच्या वडिलांनी टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना हे सांगितले. ते म्हणाले,''नशीबाशी संघर्ष करू शकत नाही. यावर्षी ऑलिम्पिक पदक नशिबात लिहिलं नसेल कदाचित. पण ती म्हणाली की मी जिद्दी आहे. तिनं फोन केला अऩ् म्हणाली पप्पा टेंशन घेऊ नका. मी संघर्ष करत राहणार. क्वालिफिकेशन फेरीत 22 मिनिट वाया गेले. काही लोकं सांगतात 17, 18, 6 मिनिटांत पिस्तुल रिपेअरिंग होते. तिनं रेंज ऑफिशियलला समस्या सांगितली, त्यातच तीन मिनिटे गेली.''

 

38 वर्षीय मेरी कोमचे सॉलिड पंच; 23 वर्षीय युवा प्रतिस्पर्धीची केली हालत खराब

टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेतील आजचा दिवस हा भारतीयांसाठी काही खास राहिला नाही. टेबल टेनिसपटू मनिका बात्राचा शानदार विजय, बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूची आगेकूच अन् बॉक्सर मेरी कोमचा विजयी पंच... हे वगळता भारताच्या वाटेला आज निराशाच आली. हॉकीत पदकाचे स्वप्न पाहणाऱ्या पुरुष संघाला ऑस्ट्रेलियाकडून 7-1 असा दारूण पराभव पत्करावा लागला. जलतरपणू श्रीहरी नटराज व माना पटेल यांना अंतिम फेरीत प्रवेश मिळवण्यात अपयश आलं. ( Tokyo Olympics: Mary Kom storms into Round of 16)

बॉक्सर मेरी कोमनं 51 किलो वजनी गटात डॉमनिकन रिपब्लिकच्या मिग्यूएलिना गार्सियावर 4-1 असा सहज विजय मिळवत उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.  पहिल्या दोन राऊंडनंतर गुणतालिका 19-19 अशी समसमान होती, परंतु त्यानंतर 38 वर्षीय मेरीनं सर्व अनुभव पणाला लावला अन् वयानं 15 वर्षांनी लहान असलेल्या प्रतिस्पर्धीला गार केले.  मेरीनं 2012च्या लंडन ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकले आहे.

टॅग्स :Olympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2021Shootingगोळीबार