पंकजला मोठय़ा भावाच्या मार्गदर्शनाचा फायदा : काजल
By Admin | Updated: November 1, 2014 00:36 IST2014-11-01T00:36:45+5:302014-11-01T00:36:45+5:30
मोठा भाऊ o्री याच्या मार्गदर्शनाचा फायदा पंकजला झाल्याचे मत पंकजची आई काजल यांनी व्यक्त केले.

पंकजला मोठय़ा भावाच्या मार्गदर्शनाचा फायदा : काजल
बंगळुरू : मोठा भाऊ o्री याच्या मार्गदर्शनाचा फायदा पंकजला झाल्याचे मत पंकजची आई काजल यांनी व्यक्त केले. क्रीडा मानसोपचारतज्ज्ञ o्री याने नेहमी पंकजला मार्गदर्शन केले आणि त्याचाच निकाल म्हणून बुधवारी पार पडलेल्या विश्व बिलियर्ड्स स्पध्रेत टाइम फॉरमॅटमध्ये बाजी मारू शकला. आई काजल म्हणाल्या, ‘‘पंकज नेहमी फोन करून o्रीकडून काही टिप्स घेत असतो आणि त्याचा रिझल्ट आपल्याला दिसतो.’’
बंगळुरूच्या या स्टार खेळाडूने गतआठवडय़ात पॉईंट फॉरमॅटमध्ये बाजी मारली होती, तर
बुधवारी इंग्लंडच्या रॉबर्ट
हॉलवर 1928-893 अशी बाजी
मारून आईला वाढदिवसाची भेट दिली.
o्री सामन्यादरम्यान पंकजला कधी फोन करीत नाही. त्याला पंकजची एकाग्रता खंडित होईल याची
भीती असते, असे काजल यांनी सांगितले. सामन्यादरम्यान पंकजने फोन केल्यास मी त्याच्याशी खेळाबाबत चर्चा करीत नाही,
कारण त्यातले काहीच कळत नसल्याचे स्पष्ट मत काजल
यांनी मांडले. (वृत्तसंस्था)