Pankaj Advani won the 8th title | पंकज आडवाणीने जिंकले २२वे जेतेपद
पंकज आडवाणीने जिंकले २२वे जेतेपद

मंडाले (म्यानमार) : भारताचा दिग्गज खेळाडू पंकज आडवाणी याने म्यानमार येथील आयबीएसएफ जागतिक बिलियर्डस् चॅम्पियनशिप स्पर्धेत नेय थ्वाय ओ याला पराभूत करीत जेतेपद पटकाविले. पंकजचे कारकिर्दीतील हे २२ वे आंतरराष्टÑीय जेतेपद आहे.
आडवाणी याने मागील वर्षीही नेय थ्वाय याला पराभूत करीत विजेतेपद पटकाविले होते. बिलियर्डस शॉर्ट प्रकारातील जागतिक स्तरावरील पंकजचे हे सलग चौथे विजेतेपद आहे. २०१४ नंतर बिलियर्डस्, स्नूकर व दोन्ही प्रकारात जेतेपद पटकाविले आहे.
आडवाणीची सामन्याची सुरुवात चांगली झाली. त्याने १४५, ८९ व १२७ च्या ब्रेकबरोबर ३-० अशी आघाडी घेतली. थ्वाय ओ याने ६३ व ६२ च्या ब्रेकनंतर पुढील फ्रेम जिंकली. यानंतर आडवाणी याने १५० व ७४ च्या ब्रेकसह सामना जिंकला.
>हा विजय अविश्वसनीय आहे. सलग चार वर्षे जेतेपद मिळविणे व मागील सहापैकी पाच अंतिम सामन्यांत विजय मिळविणे ही माझ्यासाठी विशेष बाब आहे. या विजेतेपदामुळे माझ्यातील विजयाची भूक कमी झाली नसल्याचेच स्पष्ट होते.
- पंकज आडवाणी


Web Title: Pankaj Advani won the 8th title
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.