मुंबई : जबरदस्त फाॅर्ममध्ये असलेल्या पलाश मापारा याने आपली विजयी घोडदौड कायम राखताना तिसऱ्या अखिल भारतीय बुद्धिबळ मास्टर्स स्पर्धेत एकहाती आघाडी मिळविली. पलाशने सर्वाधिक ५ गुणांसह महत्त्वपूर्ण आघाडी घेत आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर दडपण आणले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पलाशनं पुनितचा विजयी सिलसिला रोखला अन्...
पेडर रोड येथील मुंबई चेस सेंटर येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत काळ्या मोहऱ्यांनी खेळताना पलाशने अप्रतिम चाली रचल्या. त्याने शांतपणे खेळताना पुनित डोडिया (४ गुण) याचा पराभव केला. सलग चार सामने जिंकलेल्या पुनितच्या मोहिमेला यामुळे जबर धक्का बसला. या पराभवामुळे त्याची संयुक्तपणे तिसऱ्या स्थानी घसरण झाली. श्रीराम म्हसाणे, प्रतीक यादनिक, यशराज राठी, एजीएम राजवीर नहर आणि श्रेयांश सोमैया हे पाच खेळाडू प्रत्येकी ४.५ गुणांसह संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर आहेत.
श्रेयांशची विजयी घोडदौड; तिसऱ्या अखिल भारतीय बुद्धिबळ मास्टर्स स्पर्धेत सलग तिसरा विजय
यशराज-प्रतीक यांच्यात बरोबरीची लढत
दुसऱ्या पटावर यशराज राठी आणि प्रतीक यादनिक यांच्यातील सामना बरोबरीत सुटला. श्रेयांश आणि राजवीर नाहर यांनी काळ्या मोहऱ्यांनी खेळताना प्रभावी विजय मिळवले. श्रेयांशने तिसऱ्या पटावर अहान कटरूका (३.५ गुण) याचा पराभव केला, तर राजवीरने श्रीरंग आघरकर (३.५ गुण) याच्यावर मात केली. पाचव्या फेरीतील इतर निकाल
पुनित डोडिया (४) पराभूत वि. पलाश मापारा (५); यशराज राठी (४.५) बरोबरी वि. प्रतीक यादनिक (४.५); एएफएम सोहम पवार (४) बरोबरी वि. एआयएम आकाशकुमार यादव (४); श्रीराम म्हसणे (४.५) विजयी वि. अनय बांका (३.५); पंकज बोरसे (४) बरोबरी वि. आनंद अय्यर (४); प्रिशा मरगज (४) विजयी वि. एएफएम ओंकार गायकवाड (३.५); तनुज दयाल (४) विजयी वि. नीव बाफना (३); प्रग्नय सिंग (३) विजयी वि. अर्जुन सिंग (३).
Web Summary : Palash Mapara dominates the All India Chess Masters, securing a fifth consecutive win and taking the sole lead with 5 points. He defeated Punit Dodia, while other matches saw draws and victories, shaping the leaderboard.
Web Summary : अखिल भारतीय शतरंज मास्टर्स में पलाश मापारा का दबदबा, पांचवीं लगातार जीत के साथ 5 अंकों के साथ एकमात्र बढ़त बनाई। उन्होंने पुनित डोडिया को हराया, जबकि अन्य मैचों में ड्रॉ और जीत हुई, जिससे अंक तालिका आकार ले रही है।