काही दिवसांपूर्वीच युवा धावपटू हिमा दास हिने जागतिक अॅथलेटिक्समध्ये भारताचा तिरंगा अभिमानाने फडकविल्यानंतर बुधवारी युवा भालाफेकपटू नीरज चोप्रा यानेही भारतासाठी अभिमानास्पद कामगिरी केली. ...
भारताला जागतिक अजिंक्यपद ( 20 वर्षांखालील ) स्पर्धेत ट्रॅक प्रकारात ऐतिहासिक सुवर्ण जिंकून देणा-या हिमा दासचा आसाम राज्य सरकारकडून आगळा सन्मान करण्यात आला. सुवर्णकन्येला राज्याची 'स्पोर्ट्स अॅम्बेसेडर' करण्यात येणार असल्याची घोषणा केली. ...
भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा याने आपल्या खात्यात आणखी एक सुवर्णपदकाची भर घातली. फ्रान्स येथील सोटेव्हिल अॅथलेटिक स्पर्धेत त्याने 85.17 मीटर भालाफेक करून सुवर्णपदक जिंकले. ...
जगातील वेगवान धावपटू उसेन बोल्टचे फुटबॉलप्रेम जगजाहीर आहे. इंग्लिश प्रीमिअर लीगमधील मँचेस्टर युनायटेड क्लबचा चाहता असलेल्या बोल्टने अॅथलेटिक्स म्हणून निवृत्ती पत्करल्यानंतर फुटबॉलपटू होण्याची इच्छा व्यक्त केली होती. ही इच्छा पूर्ण होण्याच्या मार्गावर ...
जागतिक अजिंक्यपद (20 वर्षांखालील ) स्पर्धेत भारताला ट्रॅक प्रकारात पहिले सुवर्णपदक जिंकून देणा-या हिमा दासने कधी पदकासाठी सराव केला नाही, तिने नेहमी घड्याळाच्या काट्याशी स्पर्धा केली आहे. तिच्या यशामागचे हे गुपित तिचे प्रशिक्षक निपुण दास यांनी उलगडले ...
हिमा दासने 20 वर्षांखालील जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताला ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकून दिले. मात्र, भारतीयांना या सुवर्ण कामगिरीपेक्षा तिची ' जात ' जाणून घेण्यास अधिक रस असल्याचा लाजीरवाणा प्रकार समोर आला आहे. गुगलवर 'hima das caste' हा विषय सर्वाधिक ...