पान 4 : गोव्यात आठ महिन्यांत 11 महिलांचे खून
By Admin | Updated: September 12, 2014 22:38 IST2014-09-12T22:38:23+5:302014-09-12T22:38:23+5:30
गोव्यात आठ महिन्यांत 11 महिलांचे खून

पान 4 : गोव्यात आठ महिन्यांत 11 महिलांचे खून
ग व्यात आठ महिन्यांत 11 महिलांचे खूनतीन खुनांत पतीचाच हात : दोन अल्पवयीन मुलींच्याही हत्यासुशांत कुंकळयेकर : मडगावगोव्यात महिलांवरील अत्याचार वाढलेले असतानाच महिलांचे खून करण्याचेही प्रकार वाढले आहेत. मागच्या आठ महिन्यांत गोव्यात एकूण 23 खुनांची नोंद झाली आहे. त्यापैकी 11 खून हे महिलांचे असून तीन महिलांचे खून त्यांच्या पतीनेच केल्याचे उघडकीस आले आहे.शुक्रवारी कुंकळ्ळी येथील जीया नाईक या 35 वर्षीय महिलेचा तिचाच पती जयेश नाईक याने खून केल्याने हा सारा परिसर हादरून गेला. जीयावर संशय असल्यानेच जयेशने हा खून केला असावा, असा प्राथमिक निष्कर्ष काढला आहे. हा खून अत्यंत निर्घृण आहे. जीयाच्या अंगावर कित्येक सुर्याचे वार केल्याचे उघडकीस आले आहे. यापूर्वी अशाच प्रकारच्या आणखी दोन घटना झाल्याची माहिती पोलीस दफ्तरातून प्राप्त झाली आहे. 1 फेब्रुवारी रोजी अनिशा बार्ला या मूळ झारखंड येथील महिलेचा धारगळ येथे तिचाच पती सुनील याने खून केला होता. अनिशाच्या चारित्र्यावर असलेल्या संशयानेच खून झाला होता. 4 जून रोजी केरी-सत्तरी येथे भाग्यर्शी झोरे या 23 वर्षीय महिलेचा खून झाला होता. याही प्रकरणात पोलिसांनी तिच्या पतीला ताब्यात घेतले होते.जानेवारीपासून गोव्यात महिलांचे खून करण्याच्या घटना होत असून 31 जानेवारी रोजी काणकोण येथील विजया पागी या मासे विक्रेतीवर राम भरोसे या बिहारी कामगाराने प्रथम बलात्कार करून नंतर खून केला होता. 1 जून रोजी अशीच एक घटना गोवा वेल्हा येथे घडली होती. एका 69 वर्षीय वृद्धेवर बलात्कार करून नंतर तिचा खून केला होता. जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांच्या दरम्यान गोव्यात दोन लहान मुलींचेही खून होण्याच्या घटना घडल्या आहेत. यापैकी पहिली घटना कुंकळ्ळी येथे ओद्योगिक वसाहतीजवळ घडली होती. एका सहा वर्षीय मुलीचा खून केल्याच्या आरोपावरून कुंकळ्ळी पोलिसांनी शशिकांत गावकर या इसमाला अटक केली होती. मात्र, त्याच्याविरुध्द काहीच ठोस पुरावे हाती न लागल्यामुळे अजून त्याच्यावर आरोपपत्रही दाखल करण्यात आलेले नाही. 90 दिवसांत आरोपपत्र दाखल न केल्यामुळे न्यायालयाने त्याला जामीनमुक्त केले आहे. 25 ऑगस्ट रोजी नेसाय येथे रुबीना पोसे या बारा वर्षीय मुलीचा मृतदेह विहिरीत सापडला होता. तिच्या मृतदेहावर जखमा सापडल्याने हा खुनाचा प्रकार असल्याचे उघडकीस आले होते. मात्र, रुबीनाचा खुनी कोण हे अजूनपर्यंत पोलिसांना समजलेले नाही. महिलांचे खून होण्याच्या 11 घटनांपैकी हणजुणे व कुंकळ्ळी या पोलीस स्थानकात प्रत्येकी दोन गुन्हय़ांची नोंद झाली आहे, तर काणकोण, कोलवा, पेडणे, आगशी, वाळपई व मायणा-कुडतरी पोलीस स्थानकात एका घटनेची नोंद झाली आहे. या 11 खुनांपैकी तीन खुनांचा तपास अजून लागलेला नाही. तर एका प्रकरणात पोलिसांचा तपास भरकटला आहे.