पेस फायनलमध्ये

By Admin | Updated: April 2, 2017 02:15 IST2017-04-02T02:15:10+5:302017-04-02T02:15:10+5:30

उझ्बेकिस्तानविरुद्ध डेव्हिस चषक लढतीसाठी भारतीय संघात राखीव म्हणून समाविष्ट करण्यात आलेल्या लिएंडर पेसने चॅलेंजर टूरमध्ये आपला जोडीदार कॅनडाचा आदिल

Paes in the final | पेस फायनलमध्ये

पेस फायनलमध्ये

लियोन : उझ्बेकिस्तानविरुद्ध डेव्हिस चषक लढतीसाठी भारतीय संघात राखीव म्हणून समाविष्ट करण्यात आलेल्या लिएंडर पेसने चॅलेंजर टूरमध्ये आपला जोडीदार कॅनडाचा आदिल शमासदीप याच्या साथीने अंतिम फेरीत धडक मारली.
तृतीय मानांकित पेस आणि आदिल या जोडीने ७५,000 डॉलर बक्षीस रकमेच्या हार्ड कोर्ट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत ल्यूक सेविले आणि जॉन पॅट्रिक स्मिथ या आॅस्ट्रेलियन जोडीचा ६-७, ६-४, १0-५ असा पराभव केला.
अंतिम फेरीत पेस आणि आदिल या जोडीचा अंतिम सामना स्वित्झर्लंडच्या लुका मार्गारोली आणि ब्राझीलच्या कारो जाम्पियेरी या जोडीशी होईल.
या हंगामात पेस प्रथमच एखाद्या स्पर्धेत अंतिम फेरीत खेळेल. तो याआधी दुबई चॅम्पियनशिप आणि डेलरे बीच ओपनच्या उपांत्य फेरीत पोहोचला होता.
पेसने एटीपी विश्व टूरमधील आधीचे विजेतेपद २0१५ मध्ये जिंकले होते. त्याने आणि दक्षिण आफ्रिकेच्या रावेन क्लासेन यांनी आॅकलंडमध्ये स्पर्धेत विजेतेपद पटकावले होते.

Web Title: Paes in the final